Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाTeam India: ६ पैकी ६ सामने जिंकले तरी सेमीफायनलमध्ये नाही पोहोचली टीम...

Team India: ६ पैकी ६ सामने जिंकले तरी सेमीफायनलमध्ये नाही पोहोचली टीम इंडिया? जाणून घ्या समीकरण

मुंबई: भारतात सुरू असलेला एकदिवसीय विश्वचषक आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. यानंतर होणारे प्रत्येक सामने संघांसाठी महत्त्वाचे आहेत. यातील विजय-पराभव हे त्यांना सेमीफायनलमध्ये नेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्सने या स्पर्धेत अनेक मोठे उलटफेर केले आहेत.

टीम इंडियाने(team india) या विश्वचषकात आतापर्यंत ६ पैकी ६ सामने जिंकले आहेत. यासोबतच ते १२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. असे असतानाही त्यांनी आतापर्यंत सेमीफायनलसाठी क्वालिफाय केलेले नाही. वर्ल्डकपमध्ये ज्या पद्धतीने धक्कादायक निकाल लागले आहेत त्यामुळे खालच्या रँकिंगच्या संघांनी अनेक दिग्गज संघांचे गणित बिघडवले आहे. आता प्रत्येक संघ नॉकआऊट स्टेजला आपले स्थान सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करत आहे.

सहा सामन्यांपैकी सहा सामनेही जिंकून रोहित शर्मा अँड कंपनीला आतापर्यंत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करता आलेले नाही. गतविजेत्या इंग्लंड संघाचे सध्या २ गुण आहेत. त्यांना आणखी तीन सामने खेळायचे आहेत. इंग्लंडची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कमीच आहे.

सेमीफायनलसाठी मॅजिक नंबर काय आहे?

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी १४ अंकांची आवश्यकता आहे. १२ अंक असतानाही सेमीफायनलला पोहोचता येते मात्र यासाठी दुसऱ्या संघांची मदत घ्यावी लागेल. सेमीफायनलमध्ये जागा बनवण्यासाठी भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया फेव्हरेट आहे.

टीम इंडियाला आपल्या उऱलेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकावा लागेल. यामुळे ते सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतील. आता टॉप ४ शिवाय इतर संघ १४ अंकाची बरोबरी करू शकणार नाही. अफगाणिस्तान ज्यांचे १२ गुणच होऊ शकतात.

न्यूझीलंड ६ सामने गुण ८

सलग दोन सामन्यांतील पराभवाने त्यांना मागे टाकले आहे. जर ते दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधातील उऱलेल्या सामन्यांपैकी २ सामने जिंकतात तर ते पुढे जाऊ शकतात. मात्र ते जर दोन सामने हरले खासकरून पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध तर त्यांचे टेन्शन वाढू शकते.

ऑस्ट्रेलिया सामने ६ अंक ८

न्यूझीलंडप्रमाणेच कांगारूंनाही अंतिम ४मध्ये पोहोचण्यासाठी कमीत कमी दोन सामने जिंकावेच लागतील. ऑस्ट्रेलियाला पुढील सामने इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहेत. जर ऑस्ट्रेलियाचा संघ तीनपैकी केवळ एकच सामना जिंकत असेल तर त्यांच्यासाठी सेमीफायनलची वाट कठीण असेल.

दुसऱ्या संघांना काय होणार फायदा?

अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या संघांकडेही टॉप ४मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. जर अफगाणिस्तानने आपले पुढील तीन सामने जिंकले तर ते १२ गुणांसह लीग राऊंड संपवतील. इतकंच की श्रीलंका आणि पाकिस्तान जर पुढील तीन सामने जिंकतात तर १० गुणांसह त्यांचा राऊंड संपेल.नेदरलँड्सही असे करू शकते.

सगळ्यात कठीण परिस्थिती समजून घ्या जर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पुढीलपैकी केवळ एकच सामना जिंकतात, पाकिस्तान आणि श्रीलंका तीन सामने जिंकतात, अफगाणिस्तान तीनपैकी दोन सामने जिंकतात आणि दक्षिण आफ्रिका आपले तीनही सामने हरत असेल तर ६ संघाचे १० गुण होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -