श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी वेलू क्रालपोरा गावातील त्यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. डार पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते.
अज्ञात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तंगमार्ग येथे नेण्यात आले होते. येथे गंभीररित्या जखमी झालेल्या डार यांनी अखेरचा श्वास घेतला.
दहशतवाद्यांवी तीन दिवसांत तिसरे प्रकरण समोर आले आहे. तर तीन दिवसांत पोलिसांवर केलेला हा दुसरा हल्ला आहे. रविवारी श्रीनगरमध्ये इन्स्पेक्टर मंसूर अली यांच्यावर हल्ला झाला होता. ते आता रूग्णालयात आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून श्रद्धांजली
काश्मीर झोनच्या पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलवरून मंगळवारी रात्री ८ वाजता सांगितले की जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलना वाचवण्यास अपयश आले आहे. त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या नाजूक क्षणी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत.