World Cup 2023: अफगाणिस्तानचा विश्वचषकातील तिसरा विजय, श्रीलंकेला केले चारीमुंड्या चीत

  53

पुणे: भारताच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या वनडे विश्वचषक २०२३ मध्ये(world cup 2023) अफगाणिस्तान संघ(afganistan) जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. संघाने एक, दोन नव्हे तर तीन वेळा धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. पहिल्यांदा अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले, त्यानंतर पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर आता श्रीलंकेला चारीमुंड्या चीत केले.


हा सामना सोमवारी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला ७ विकेटनी हरवले. सामन्यात अफगाणिस्तानला २४२ धावांचे आव्हान दिले होते.



अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांनी झळकावली अर्धशतके


श्रीलंकेने दिलेले २४२ धावांचे आव्हान अफगाणिस्तानच्या संघाने ३ विकेट गमावताना पूर्ण केले. तसेच ४५.२ षटकांतच त्यांनी हे आव्हान पूर्ण केले. संघाकडून तीन जणांनी अर्धशतके ठोकली. अजमतुल्लाह उमरजईने नाबाद ७३ आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर रहमत शाहने ६२ धावांची तुफानी खेळी केली.


सामन्यात रहमत शाह आणि कर्णधार शाहिदीने सलग दुसरे अर्धशतक ठोकले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. रहमत बाद झाल्यानंतर शाहिदीने उमरजईसोबत नाबाद १११ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी, श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. त्यांची सुरूवात खराब झाली. त्यांनी २२ धावांवर दिमुथ करूणारत्नेची विकेट गमावली. यानंतर पथुम निसंका आणि कर्णधार कुसल मेंडिस यांच्यात ६२ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर मेंडिसने सदीरासोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा केल्या.

Comments
Add Comment

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी