World Cup 2023: विश्वचषकात २० वर्षानंतर इंग्लंडला हरवू शकणार का भारत?

लखनऊ: भारतीय संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३मधील(icc cricket world cup 2023) आपला सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना २९ ऑक्टोबरला लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी २ वाजल्यापासून सुरु होईल.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना काँटे की टक्करचा होणार आहे. येथे इंग्लंडचा संघ वर्ल्ड चॅम्पियन आहे तर भारताने दोन वेळा विश्वविजेतेपद जिंकले आहे. ही बाब वेगळी की या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत पाच पैकी चार सामन्यात पराभव पत्करला आहे आणि त्यामुळे ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. दुसरीकडे भारताने आतापर्यंतच्या पाचपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे.



आकड्यांनुसार इंग्लंड भारी


इंग्लंडकडून गतविजेचा हा खिताब कोणीच घेऊ शकत नाही. दरम्यान इंग्लंडकडे आता गमावण्यासारखे काही नाही त्यामुळे ते इतर संघांचा खेळ बिघडवू शकतात. विश्वचषकात भारत-इंग्लंड सामना कधीच एकतर्फी झालेला नाही. विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंडचे आकडे चांगले आहेत. ८ सामन्यांपैकी ४ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे तर तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला. तर १ सामना अनिर्णीत राहिला.विश्वचषकात भारताने इंग्लंडविरुद्ध २००३मध्ये शेवटचा विजय मिळवला होता.


त्यामुळे तब्बल २० वर्षानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करेल. भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहता टीम इंडिया २० वर्षांचा दुष्काळ संपवेल असे वाटत आहे.



विश्वचषकासाठी संघ


इंग्लंड - जोस बटलर(कर्णधार), ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, क्रिस वोक्स, सॅम कुरेन, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वूड, ब्रायडन कार्स, गस एटकिंसन,


भारत - रोहित शर्मा(कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादवdia vs

Comments
Add Comment

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या

IPL 2026 : शुभमन गिलच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सच्या चिंतेत वाढ

मुंबई : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आयपीएल २०२६ च्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajsthan Royals) सामन्यात

IPL 2026 : रोमांचक मुकाबल्यात राजस्थानचा गुजरातवर ’रॉयल’ विजय

अहमदाबाद: रवी बिश्नोईच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. राजस्थानने