Globalisation : जागतिकीकरणात हरवले मूल्यसंस्कार

Share
  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, शुभंकरोती कल्याणम. काय मंडळी लक्षात येते का? नाही ना आता आपणच आपली ओळख विसरायला लागलो आहोत! ज्या वयामध्ये मुलांना संस्कार दिले जातात, त्या वयात हातात मोबाइल आला, तर ते होईल का? खिमटी, तूपभात, वरण-भात, पोळी भाजी, चटणी-भाकरी या सगळ्यापलीकडे जात पिझ्झा, बर्गर, पास्ता, मॅगी इथंपर्यंत स्वारी पोहोचली कशी? कळलेच नाही. इतकंच काय हौस म्हणून मंगळागौर करायची म्हटलं, तर नऊवारी नेसता येते कुठे ती सुद्धा रेडीमेड. जीन्समधल्या आईला आपण बदललोय हे सुद्धा कळले नाही. धर्माचरण, संस्कार, अध्यात्म, रित-भात संस्कृती आणि परंपरा विस्मरणात गेले आहे की फॅशन झाली आहे. परवाच एका हॉस्पिटलच्या बाहेर गाडी पार्क करताना एक शाळा पाहिली जेमतेम पाच-सहा वर्षांच्या मुली बुरखा घातलेल्या नाजूक कोवळ्या वयातील खेळकर चिमुकल्या करकच्च आवळून घेतलेल्या कपड्यात. फरक लक्षात आला का? आलाच असेल. योग्य त्या जसं मातीत बी रुजवावं लागतं, तेव्हाच कुठं वेलीचे संरक्षण होऊन रोप तयार होतं आणि फळ-फुलं लागतात.

वयामध्ये संस्कारात इतकी ताकद असते की, घडवायचं की बिघडवायचं? हे वेळच्या वेळीच होतं. एक टाका वेळीच घातला, तर अख्खं कापड उचलत नाही, तसंच आहे. आयुष्याचा सुद्धा कुंभार जसा मातीला आकार देतो, ते चिलीम बनायचं की माठ? कसं आहे योग्य वयात योग्य शिकवण मिळाली की, जीवनाचं सोनं होतं, स्वर्ग, नंदनवन होतं. शिस्तीचे कुंपण असायला हवं कुठेतरी ते अति होतंय, तर कुठे अजिबातच नाहीये. गीताई मनाचे श्लोक गीता आपल्या मुलांच्या हाती आपण देण्याऐवजी फक्त आणि फक्त मोबाइल देतो. पण आता ती वेळ नाही. शिक्षणाबरोबर संस्कार, व्यवहार, ज्ञान, कौशल्य, प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. अनिवार्य आहे आणि बदलत्या काळाबरोबर त्याची निकडही आहे. प्रश्न आहे सध्या वस्त्र परिधानाचा आपल्या मुली वाढवताना आपण पालकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. निदान अंगभर कपडे तरी घालायला द्या. खांद्या, गुडघ्यावर मुद्दामहून फाडलेली किंवा चिंध्या नेसलेली ती कसली फॅशन? फाटके, ठिगळाचे कपडे घालून म्हणजे फॉरवर्ड दुनिया हे सारं घातक ठरू लागले. कपड्यांचे झालं आता उदरभरण आज का घरातलं काम, स्वयंपाक, पाणी, वेळच्या वेळी करणे हे पूर्वीसारखं राहिलंच नाही.

मुळी फॅशन, इन्स्टंट, ऑनलाइन सगळंच असंवेदनशील आणि म्हणायचं प्रॅक्टिकल. हट्ट, लाडबद्दल स्पर्धा, तुलना यातून निष्पन्न काय होणार? आपली जीवनशैली बदलून रोगराई मात्र वाढणार. ३०/४० वयामध्ये बीपी, शुगरसारखे आजार जडतात. कधीतरी आपल्या मुलांना पाड्यावरचा चहा दाखवा. शेतावर खळ्यातलं पीक दाखवा. शेतमळा हिरवी झाडी डोंगरदऱ्यांकडे कपार खेडोपाडी गुरं पाळण्यातला आनंद, शेतावरल्या कांदा, चटणी, भाकरी दाखवायला हवं. केवळ चुलीवरचं जेवण, चुलीवरचा चहा, चुलीवरचे मटण, आता नावापुरती फॅशन.

अभ्यासाचे म्हणाल, तर स्पर्धा जीवघेणी, प्रवेशासाठी धडपड. अगदी फुलपाखरासारखे बागडणाऱ्या वयामध्ये नैसर्गिक जीवन जगतानाही अपेक्षांचे, गुणवत्तेचे, टक्केवारीचे ओझं लादल्याने त्या कोवळ्या मनावर ताण असतो. या ताण-तणावाचं शरीरावर परिणाम अति घातक असतात. आजची जीवनशैली ही अतिशय वेगळी झालीय. कारण आपण आहोत हे पालकांनी देखील लक्षात आणलं पाहिजे की, आपल्या काळी आपण काय होतो? कसे होतो? काय केले कशा पद्धतीने जगलो? कष्टाला पर्याय नाही जीवनात परिश्रमाची परिसीमा गाठली की जगणे नंदनवन होईल. असे मूल्य, असे संस्कार आणि वळण शिस्तीचे कुंपण जर आपण आपल्या मुलांना घालून दिले, तर निश्चितच त्या मुलांना जाणीव होईल आणि वाचन संस्कृतीची स्वयंशिस्त अंगीकारावी. जन्मदिवस शुभेच्छा, भेटवस्तू, बक्षिसे, पुरस्कार याकरिता सुंदर वाचनीय पुस्तके भेट, बहाल करावीत. जेणेकरून भाषाप्रभुत्व व्यक्तिमत्त्व विकास समृद्ध होईल. वैचारिक प्रगल्भता, नीतिमूल्य जोपासना होईल. सामाजिक प्रबोधन बातम्या घडामोडी यांची सखोल ज्ञान केवळ व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर हातात इंटरनेटचा वापर न करता वेळप्रसंगी जास्तीत-जास्त पुस्तके आणि वर्तमानपत्रे यांचादेखील महत्त्वाचा वाटा असतो. जो आपल्या काळी होता. आपल्या काळी पाटी-पेन्सिल आणि अंकलिपी असायची, तेव्हा सर्व पाढे पाठ, हस्ताक्षर चांगलं. आता शुद्धलेखन निबंधलेखनापेक्षा प्रोजेक्टवर भर दिला जातो. ते लागणारे साहित्य पालकांना ताणच. यापेक्षा चार बी-बियाणे, रोपे लावा हरितक्रांतीची योजना त्यातून पर्यावरण संवर्धन व्हावे. यापेक्षा वेगळेच चित्र दिसते. शालेय शिक्षण पद्धतीमध्ये व्यवहारज्ञान काडीचेही नसतं. भाराभर चिंध्याच.

आपल्या महाराष्ट्रामध्ये सारस्वतांचा वीरांचा, शुरांचा, पुस्तकातून मिळत असेल, तर निश्चितच आजच्या पिढीला मराठी भाषासंस्कृतीचा गोडवा जतन संवर्धनाबाबत सांगावे. उद्या या शब्दाचा अर्थ ते काल लावतात आणि काल शब्दाचा अर्थ उद्या लावतात. बऱ्याचदा मातृभाषा असूनही मुलांना चुका सुधाराव्यात. पालक म्हणून आपली ही बांधिलकी जपू, चला जागे होऊ या आणि ‘मना घडवी संस्कार’ असे संस्कारदीप उजळू या.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

1 hour ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago