Matthew Perry died : 'हाय आय ॲम शँडलर'... फ्रेंड्समधल्या शँडलरचं निधन; जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का

  187

वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप


लॉस एंजेलिस : 'हाय आय ॲम शँडलर... आय मेक जोक्स व्हेन आय ॲम अनकम्फर्टेबल', असं म्हणत फ्रेंड्स (Friends Series) या प्रसिद्ध सिरिजमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणार्‍या शँडलर बिंग (Chandler Bing) म्हणजेच अमेरिकन-कॅनडीयन अभिनेता (American-Canadian actor and comedian) मॅथ्यू पेरी याचं निधन (Matthew Perry died) झालं आहे. काल शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास अमेरिकेतील लॉस एंजिलिसमधील (Los Angeles) त्याच्या राहत्या घरी गरम बाथटबमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या निधनाने हॉलिवूडमध्ये (Hollywood) शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी मॅथ्यूने अशा प्रकारे जगाचा निरोप घेणं चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारं आहे.


लॉस एंजेलिस टाईम्सने (Los Angeles Times) दिलेल्या वृत्तानुसार, मॅथ्यूचा त्याच्या घरातील गरम टबमध्ये बुडल्यामुळे मृत्यू झाला. माहिती मिळताच त्याच्या घरी संध्याकाळी ४ वाजता अधिकारी पोहोचले, जिथे तो प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. परंतु त्याच्या आजूबाजूला कोणतेही ड्रग्ज किंवा अल्कोहोल आढळून आलं नाही. तपास सुरू असून, मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही.


यशाच्या शिखरावर असताना मॅथ्यू पेरीला ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. त्याने अनेक वर्षे अल्कोहोलच्या व्यसनाशी लढा दिला आणि अनेक प्रसंगी पुनर्वसन क्लिनिकमध्ये हजेरी लावली. पेरीला त्याच्या ड्रग्जच्या सेवनामुळे २०१८ मध्ये कोलन फुटणे यासह आरोग्याच्या समस्या आल्या. यामुळे त्याला अनेक शस्त्रक्रियांना तोंड द्यावं लागलं आणि नंतर काही महिने कोलोस्टोमी बॅग वापरणंही आवश्यक झालं होतं.


गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या त्याच्या "फ्रेंड्स, लव्हर्स अँड द बिग टेरिबल थिंग" (Friends, Lovers and the big terrible thing) या संस्मरणात, पेरीने डझनभर वेळा डिटॉक्समधून जात असल्याचे आणि शांत होण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केल्याबद्दल वर्णन केले आहे. पेरीने हे पुस्तक सर्व पीडितांना समर्पित केले आणि प्रस्तावनामध्ये लिहिले होते की, "मी मेलं पाहिजे".


'फ्रेंड्स' या १९९४ मध्ये सुरु झालेल्या सिरीजचे दहाही सीझन्स प्रचंड गाजले. त्यातील मॅथ्यूच्या प्रेमळ आणि व्यंग्यात्मक शँडलर या पात्राला विशेष लोकप्रियता मिळाली. त्याच्या जाण्याने भारतातीलही अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन मॅथ्यूला श्रद्धांजली वाहिली आहे. जगभरातील चाहत्यांकडून स्टोरीज, पोस्टस आणि स्टेटसच्या माध्यमातून मॅथ्यूच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

Comments
Add Comment

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात

गाझा पट्टीत इस्रायलचे सैनिक, गाझा ताब्यात घेणार

गाझा : इस्रायलच्या सैन्य तुकड्या गाझा पट्टीत घुसू लागल्या आहेत. शक्य तितक्या लवकर संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात

युद्ध संपणार! पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील भेट लवकरच, व्हाईट हाऊसमध्ये बैठकीनंतर ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

नेपाळच्या पंतप्रधानांना भारत दौऱ्याचे निमंत्रण

काठमांडू : नेपाळच्या दोनदिवसीय दौऱ्यावर असलेले भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रविवारी पंतप्रधान के.

नायजेरियामध्ये बोट उलटली, ४० लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू

अबुजा: नायजेरियामध्ये एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट उलटून ४० लोक बेपत्ता झाले

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार; ३०७ लोकांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

इस्लामाबाद: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे