अहमदनगर : अहमदनगर येथील प्रख्यात सीए व सामाजिक कामात सतत अग्रेसर असणारे डॉ. शंकर अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
स्वदेशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. देवेंद्र यादव, राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह खैनवार यांनी डॉ. अंदानी यांची ही निवड जाहीर केली. हिंदू धर्म जनजागृती, भारताला आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी, सनातन धर्म आणि राष्ट्रधर्माची सेवा करुन भारताला विश्वात अग्रेसर ठेवण्यासाठी आपले योगदान मिळावे असे स्वदेशी सनातन संघाने अपेक्षा व्यक्त केली आहे.
डॉ. अंदानी यांना नुकताच ऑनर ऑफ अशोक अवॉर्ड हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अगोदरही त्यांच्या सेवाभावी कामाची दखल घेत राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार, मान-सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.