वाडा : वाडा तालुक्यातील चंद्रपाडा (कोंढले) येथील कु. ममता लहांगे हिची सीमा सुरक्षा दल (Border Security Force) मध्ये निवड झाली आहे. आजपासूनच तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये दाखल झालेली वाडा तालुक्यातील ममता ही पहिली मुलगी असल्याने तिचे प्रचंड कौतुक होत आहे. तर वाडा वासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
ममता लहांगे हिने वाड्यातील पहिली महिला सैनिक होण्याचा मान मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई पोलिसांत निवड होऊन सुद्धा तिने सीमा सुरक्षा दल सारखं सैन्य क्षेत्र निवडलं यावरून तिच्या मनात असलेली देशभक्तीची जाणीव होत आहे.
लवकरच यशस्वी सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून ती सैन्य सेवेत दाखल होऊन वाडा तालुक्याचे तसेच पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सेवा करेल. यामुळे तिच्यावर प्रत्येक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…