Dhule Leopard news : धुळ्यातील मोघण शिरुड गावात बिबट्याचा उच्छाद

पाच दिवसांत दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा बळी


धुळे : माणसांनी जंगलावर अतिक्रमण केल्याने प्राण्यांचे मानवी वस्तीत येणे ही आता नवी बाब नाही. त्यांचं घर हिरावल्याने आपणच या गोष्टीला जबाबदार आहोत. मात्र, अशाच एक घटनेमुळे धुळ्यातील (Dhule news) मोघण शिरुड गावातील चिमुकल्यांचे नाहक बळी गेले आहेत. या गावात बिबट्याने (Leopard) शिरकाव करुन उच्छाद मांडला आहे. गेल्या पाच दिवसांत तीन जणांचा बळी गेला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. शिवाय आणखी एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.


शिरुर गावच्या परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक महिद गुप्ता यांच्याशी या घटनेसंदर्भात आज चर्चा केली. यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचा आणि ते शक्य झालं नाही तर ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.


शिरुर गावात बिबट्याने घातलेल्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन जणांचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गेल्याने नागरिक घाबरुन वावरत आहेत. काल सकाळी एका लहान बालकाचा देखील बिबट्याने चावा घेतला. त्या बालकावर सध्या हिरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


एकीकडे बिबट्याने उच्छाद मांडलेला असताना दुसरीकडे गावात कापूस वेचणीच्या कामाला वेग आला आहे. हे दिवस कापूस वेचणीचे असल्याने या वेळेतच गावात बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आणि त्या पद्धतीची दवंडी गावात पिटवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून