Eternal Lord : अनंतस्वरूप परमेश्वर


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


परमेश्वर हा Infinite in every aspect. असा हा जो परमेश्वर आहे त्याला आपण म्हणजे एक लाट आहोत, ती लाट कशी काय आकळणार? समुद्रात अनेक लाटा उसळतात. तिला बोलता येते असे समाजा व तुम्ही तिला विचारलेत, तू समुद्राला आकळू शकतेस का?, तर ती म्हणेल मी छोटीशी लाट एवढ्या मोठ्या समुद्राला कशी काय आकळणार? समुद्राला, तरी काहीतरी आदी व अंत आहे. पण परमेश्वराला आदीही नाही व अंत नाही. असा हा जो परमेश्वर आहे याचा शोध लागेल असे मला, तरी वाटत नाही. आपण जितका त्याचा शोध करण्याचा प्रयत्न करू तितका तो उरणार. उदाहरण द्यायचे झाले, तर क्षितिज आपल्याला जे क्षितिज दिसते त्या दिशेने आपण जितके पुढे पुढे जाऊ तितके ते पुढे पुढे जाते. आपली सावली पडलेली असते ती जर आपण पकडण्याचा प्रयत्न केला, तर ती अधिकच पुढे पुढे जाते. तसे परमेश्वराचे आहे.



परमेश्वर हा अनंतस्वरूप आहे. सर्व बाजूने अनंतस्वरूप आहे. नुसते कळणे हे सुद्धा कठीण आहे. आम्ही जे सांगतो तेही थोडेच सांगतो. एवढ्या मोठ्या समुद्राचा अनुभव कुठेही घेता येतो. समुद्र कसा आहे? असे विचारले, तर कुठेही गेलात व ओंजळीत घेतले, तर तो खारट आहे. समुद्र कुठेही गेलात, तरी तो खारट आहे. त्याचा रंग हिरवट निळसर आहे. कुठेही गेलात, तरी रंग तसाच त्याची खोली जी आहे ती निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी असते. जितके पुढे पुढे जाल तितका तो खोल आहे. माणूस बुडतो का? एकतर त्याला चांगले पोहता येत नसते. जरा पुढे पुढे जातो व एक स्टेज अशी येते की याच्या पायाला जमीन लागत नाही तिथेच त्याच्या तंगड्या हलायला लागतात व माणूस बुडतो.



सांगायचा मुद्दा समुद्राला काहीतरी मर्यादा आहे. तो अफाट असला, तरी काही प्रमाणांत आपण त्याचे वर्णन करू शकतो तसे परमेश्वर हा अनंतस्वरूप असला, तरी काही प्रमाणात आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो.



“ईश्वर:सर्वभूतानांम् हृदेशेर्जुन तिष्ठती
भ्रामयेन सर्व भूतानी यंत्रा रूढानी मायया”
हे मी का सांगतो आहे. हा जो परमेश्वर आहे तो सर्वांना व्यापून आहे. अखिल व निखिल. अखिल हे दृश्यांत येते, तर निखिल हे अदृश्यांत येते. जे जे दृश्य आहे ते अखिल व जे जे अदृश्य आहे ते निखिल. या सर्वांना व्यापून टाकतो व पुन्हा उरतो. उरतो तोही Infinite. सगळ्यांना व्यापून उरतो, तोही Infinite. त्याचे सर्वच Infinite. अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून उरतो, तोही Infinite. तो आपल्या हृदयात आहे.

Comments
Add Comment

मोक्षाची अनुभूती

ऋतुराज-ऋतुजा केळकर “क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दु:खं जागी करण्या

विचारांचे सामर्थ्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   तुम्ही कुठेही जा तुमच्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १. विचार २. जीभ ३.

जीवनाचे मूल्यमापन

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य     मानवी जीवन हे केवळ घटनांची मालिका नसून, अनुभवांची, निवडींची, मूल्यांची आणि

कनकन किंडी

भारतीय ऋषी-डॉ. अनुराधा कुलकर्णी कर्नाटकातील एक आचार्य व्यासराय यांचा शिष्यपरिवार खूपच मोठा होता.

क्रियमाण

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   क्रियमाण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असणार. याचे अगदी

घे जवळी, घे जवळी...

ऋतुराज-ऋतुजा केळकर   “मैने बिगाडा हर काम अपना तुने सावरा हर काम मेरा सांचा नाम तेरा...” साजवेळी हे गीत सहजच ओठी