Vladimir Putin Heart attack : पुतीन यांच्या हार्टअ‍ॅटॅकची बातमी केवळ अफवा; रशियन सरकारचा खुलासा

मॉस्को : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना हार्टअटॅक (Heart attack) आल्याच्या बातम्या सकाळी सर्व माध्यमांतून दाखवण्यात आल्या होत्या. क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारमधीलच एका माजी अधिकार्‍याच्या टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला होता. WION या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, ही बातमी खरी नसून केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. रशियन सरकारने व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त असून हार्टअ‍ॅटॅकच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.


टेलिग्राम चॅनेलने केलेला पुतिन यांच्या हार्टअ‍ॅटॅकचा दावा क्रेमलिनने म्हणजे रशियन सरकारने फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितलं की, व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त आहेत. टेलिग्राम चॅनेलकडून असाही एक दावा करण्यात आला होता की, पुतीन गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी विदेश दौऱ्यावर जात होते, तेथे ते बॉडी डबल्ससह उपस्थित होते. तर आता हार्टअ‍ॅटॅक आल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी एका स्पेशल इनटेंसिव केअर यूनिटमध्ये उपचार घेत आहेत. तसेच डॉक्टरांनी त्यांच्यावर वेळीच उपचार करत हार्ट सर्जरी केली असून ते शुद्धीवर आले आहेत. मात्र, पत्रकारांशी बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हे सर्व दावे फेटाळले.


क्रेमलिनने एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे ज्यामध्ये देखील हार्टअ‍ॅटॅकचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान, २०२२ पासून अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतीन हे कॅन्सर आणि पार्किन्ससने ग्रस्त आहेत. त्यामुळेच ते सार्वजनिक ठिकाणी जास्त जात नाहीत. तसेच या अगोदर देखील टेलिग्रामवर पुतिन यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे अशा अफवा रशियन सरकारने फेटाळून लावल्या आहेत.

Comments
Add Comment

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक