Tuesday, July 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPutin Cardiac Attack : पुतीन यांना हार्ट अटॅक!

Putin Cardiac Attack : पुतीन यांना हार्ट अटॅक!

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना हार्ट अटॅक (Putin Cardiac Attack) आला होता, असा दावा एका टेलिग्राम चॅनलने केला आहे. ते त्यांच्या रुममध्ये खाली कोसळलेले आढळले. यानंतर डॉक्टरांनी वेळीच त्यांच्यावर उपचार करुन त्यांचा जीव वाचवला, असे या चॅनलने म्हटले आहे. क्रेमलिनमधील एका माजी अधिकाऱ्याचे हे चॅनल आहे.

WION या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ही घटना रविवारी (२२ ऑक्टोबर) घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुतीन यांना तातडीने त्यांच्या निवासस्थानी असलेल्या आयसीयू फॅसिलिटीमध्ये नेण्यात आले. जनरल एसव्हीआर नावाच्या टेलिग्राम चॅनलवरुन याबाबत माहिती देण्यात आली.

या चॅनलवरुन सांगण्यात आले, की “पुतीन यांच्या निवासस्थानी तैनात असणाऱ्या दोन सिक्युरिटी ऑफिसर्सना अचानक आतून काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. ते आत गेले असता, पुतीन फरशीवर कोसळलेले दिसून आले. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.”

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पाश्चिमात्य माध्यमांमध्ये पुतीन यांच्या तब्येतीबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. पुतीन हे मोठ्या प्रमाणात आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ते लोकांसमोर येण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे म्हटले जात आहे. जनरल एसव्हीआर या चॅनलवरुन पूर्वी असाही दावा करण्यात आला होता, की चीन दौऱ्यावर गेलेले पुतीन हे खरोखरचे पुतीन नसून, त्यांच्यासारखी दिसणारी दुसरीच व्यक्ती होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -