World cup 2023: अफगाणिस्तानचा पाकिस्तानला 'दे धक्का', मिळवला ८ विकेट राखून विजय

चेन्नई: चेन्नईच्या मैदानावर आज विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. याआधीच इंग्लंडला जोरदार धक्का देणाऱ्या अफगाणिस्तानने पाकिस्तानलाही जबरदस्त धक्का देत विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ५० षटकांत ७ बाद २८२ हा तगडा स्कोर उभा केला होता.


हा स्कोर पाहता अफगाणिस्तान आव्हान पेलेल का यात थोडी शंका व्यक्त केली जात होती. मात्र चेन्नईच्या मैदानावर चमत्कारच घडला. एखादा दिग्गज संघ ज्याप्रमाणे खेळतो त्याचप्रमाणे अफगाणिस्तानचा संघ खेळला. आणि फक्त खेळलाच नाही तर पाकिस्तानविरुद्ध जिंकलाही.


शेवटच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानआणि पाकिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मात्र बॉलचा फरक वाढल्याने अफगाणिस्तानचा विजय सोपा झाला. पहिल्यांदा फलंदाजी कऱणाऱ्या पाकिस्तानी संघात अब्दुल्लाह शफीकने ५८ धावा केल्या. तर बाबर आझमने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर शादाब खानने ४० धावा तर इफ्तिखार अहमदने ४० धावा केल्या. याच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाला ७ बाद २८२ धावा करता आल्या.


दुसरीकडे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानने दमदार सुरूवात केली. अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतके ठोकताना भक्कम पाया रचला. रहमनुल्लाह गुरबाजने ६५ धावा केल्या तर इब्राहिम झारदानने ८७ धावांची खेळी केली. रहमत शाह ७७ धावांवर नाबाद राहिला तर हश्मतुल्लाह शाहिदी ४८ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानच्या गोलंदाजांना अफगाणिस्तानचे केवळ २ गडी बाद करण्यात यश मिळाले.

Comments
Add Comment

Budapest Squash Open : वेलावन सेंथिलकुमारची फायनलमध्ये धडक; बुडापेस्ट स्क्वॉश ओपनमध्ये हंगेरीच्या स्टारशी रंगणार लढत

बुडापेस्ट : भारताचा स्टार स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमारने PSA बुडापेस्ट स्क्वॉश ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करत

FIH Hockey World Cup : जर्मनीवर ३-१ असा दणदणीत विजय; भारतीय महिला हॉकी संघाची विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी

ॲमस्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघाने FIH महिला हॉकी विश्वचषक २०२६मध्ये शानदार कामगिरी करत पाचव्या स्थानावर

Neeraj Chopra : नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत मिळवले स्थान

नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2026 डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हंगामाची

Grand Chess Tour Final : प्रज्ञानानंदने रचला इतिहास, ग्रँड चेस टूर फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला

सेंट लुईस : भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने फॅबियानो करूआनाचा पराभव करत इतिहास रचला आहे.

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून