
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर भारताला कॅनडामध्ये आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये प्रगती दिसली तर ते कॅनडाच्या लोकांसाठी लवकरच व्हिसा सर्व्हिस सुरू करू शकतात. ते म्हणाले भारताकडून काही आठवड्यांआधी ही व्हिसा सर्व्हिस अस्थायी काळासाठी थांबवण्यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा ही आहे. कॅनडा राजनैतिक अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही आहे जे व्हिएन्ना संधीचे उल्लंघन आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध अतिशय तणावपूर्ण झाले आहेत. याचे कारण खालिस्तानी दहशतवादी याचा हरदीप सिंह निज्जर याची हत्या आहे. निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केला आहे. सोबतच कॅनडाने भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना ओटावा सोडून जाण्यास सांितले.
भारताने याआधीच निज्जर हत्या प्रकरणात आपला हात नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईत कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्ली सोडण्याचा आदेश दिला होता. सोबतच कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सर्व्हिस बंद केली होती.
परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
जयशंकर म्हणाले जर आम्ही कॅनडामध्ये आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत प्रगती पाहिली तर आम्ही व्हिसा सर्व्हिस सुरू करण्याबाबत विचार करू. मी आशा करतो की असे लवकरच झाले पाहिजे. काही आठवड्यांआधी कॅनडामध्ये भारताने व्हिसा जारी करण्याची प्रोसेस बंद केली होती.
परराष्ट्र मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की सुरक्षा स्थिती अधिक चांगली होईल. ते म्हणाले चांगली सुरक्षा दिल्यास राजनैतिक अधिकऱ्यांना आत्मविश्वासाने काम करणे शक्य होईल. राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा निश्चित करणे वियना संधीचा सगळ्यात मोठा पैलू आहे. आता कॅनडामध्ये अनेक आव्हाने आहेत यामुळे आमचे लोक सुरक्षित नाहीत. आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये प्रगती होताच व्हिसा सर्व्हिस सुरू होईल.
भारतातून नुकतेच ४२ कॅनडाचे राजनैतिक अधिकारी गेले आहेत. त्यांना दिल्ली सोडण्याचा आदेश मिळाला होता.