Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाIND vs NZ: आता आपले अर्धे काम झाले आहे, आता...न्यूझीलंडला हरवल्यानंतर रोहितचे...

IND vs NZ: आता आपले अर्धे काम झाले आहे, आता…न्यूझीलंडला हरवल्यानंतर रोहितचे विधान

धरमशाला: भारतीय संघाने(team india) न्यूझीलंडला(new zealand) हरवत पाचवा विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विधान केले आहे. रोहित शर्माने आमच्या स्पर्धेची चांगली सुरूवात केली. मात्र आमचे काम केवळ आता अर्धे झाले आहे. येथून बॅलन्स बनवून चालणे गरजेचे आहे. आम्ही खूप पुढचा विचार करत नाही. जे पुढे होईल ते पाहिले जाईळ. सध्या काय गरजेचे आहे त्याचा विचार करणे गरजेचे आहे.

न्यूझीलंडला हरवल्यानंतर काय म्हणाला रोहित?

रोहित शर्मा म्हणाला, मोहम्मद शमीने संधी दोन्ही हातांनी पकडली. मोहम्मद शमीला या पिचचा अनुभव आहे. तो एक शानदार गोलंदाज आहे. एक वेळ आम्ही विचार करत होतो की आम्हाला ३०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान भेटेल. मात्र आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मी आपली फलंदाजी एन्जॉय करत आहोत. माझी आणि शुभमन गिलची खेळण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मात्र एकमेकांची खेळण्याची स्टाईल माहीत आहे.

कोहली, जडेजासाठी काय म्हणाला रोहित

विराट गेल्या अनेक वर्षांपासून अशा खेळी करत आहे. आम्ही कठीण परिस्थितीत होतो तेव्हा विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने आम्हाला बाहेर काढले. आमच्या संघाला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची गरज आहे. आमची फिल्डिंग चांगली होत नाही आहे. मात्र जडेजा जगातील सर्वात चांगल्या फिल्डरपैकी एक आहे. यात शंकाच नाही

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -