पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना (Pune News) घडली आहे. पीएमपीएमएलच्या (PMPML Bus) बसचालकाने एका वाहन चालकाशी झालेल्या वादामुळे विचित्र कारभार केला. रागाच्या भरात येऊन त्याने बस रिव्हर्स घेत १० ते १५ गाड्यांना उडवलं. प्रवाशांनी ओरडून मदत मागितली तरी बसचालकाने थांबायचे नाव घेतले नाही. सेनापती बापट रोडवर असलेल्या वेताळबाबा चौकामध्ये या चालकाने हे कृत्य केले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या बसचालकावर कलम ३०८ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
निलेश सावंत असं या आरोपी पीएमपीएल बस चालकाचं नाव आहे. त्याचा एका वाहन चालकाशी काही कारणास्तव वाद झाला. या वादामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने बस उलटी चालवत १० ते १५ गाड्यांना ठोकर दिली. बस चालकाने दारूच्या नशेत बस उलटी चालवल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी आणि स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, कृष्णा जाधव यांनी जीवाची परवा न करता काही लोकांना वाचवलं आहे.
चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीएमपीएमएल बसमध्ये ५० प्रवासी प्रवास करत होते. ही घटना घडत असतानाच बसमधील प्रवाशांनी ओरडून मदत मागितली. पण, बस चालकाने बस थांबवली नाही. यामध्ये काही गाड्याचं नुकसान झालं आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत. बसचालकाचा हा विचित्र कारभार त्याला चांगलाच महागात पडणार आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…