Thursday, July 4, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023Virat Kohli Records: विराट कोहलीचे अनेक रेकॉर्ड्स, सचिनला टाकले मागे

Virat Kohli Records: विराट कोहलीचे अनेक रेकॉर्ड्स, सचिनला टाकले मागे

पुणे: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) विराट कोहली(virat kohli) आणि रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. भारतीय संघाने गुरूवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ७ विकेट राखत विजय मिळवला. या विश्वचषकातील भारताचा हा सलग चौथा विजय आहे.

या सामन्यात विराट कोहलीने ९७ बॉलवर नाबाद १०३ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ४ षटकार आणि ६ चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट १०६.१८ इतका होता. तर शुभमन गिलने ५५ बॉलमध्ये ५३ आणि रोहितने ४० बॉलमध्ये ४८ धावा केल्या. या खेळींच्या जोरावर कोहली आणि रोहितने रेकॉर्ड्सची यादी लावली आहे.

कोहलीची नजर सचिनच्या या मोठ्या रेकॉर्डवर

एकदिवसीय विश्वचषकात धावांचा पाठलाग कराना कोहलीने आपले शतक ठोकले आहे. सोबतच कोहलीने एका बाबतीत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला आहे. कोहलीने सगळ्यात वेगवान २६ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. त्याने ५६७ डावांत हे यश मिळवले. कोहलीआधी सचिन तेंडुलकरने ६०० डावांमध्ये इतक्या धावा केल्या होत्या.

तसेच कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये दुसरा सर्वाधिक ४८ शतके ठोकणारा खेळाडू आहे. सचिन अव्वल आहे. त्याने ४९ शतके ठोकली होती. आता कोहलीची नजर हा रेकॉर्ड तोडण्यावर आहे. जर कोहलीने आणखी २ शतके ठोकली तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक आणि ५० शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरेल.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड

सचिन तेंडुलकर – ४९
विराट कोहली – ४८
रोहित शर्मा – ३१
रिकी पॉटिंग – ३०
सनथ जयसूर्या – २८

पुण्याच्या मैदानावर वनडेत कोहली

६१(८५) vs ऑस्ट्रेलिया, २०१३
१२२(१०५) vs इंग्लंड, २०१७
२९(२९) vs न्यूझीलंड, २०१७
१०७(११९) vs वेस्टइंडीज, २०१८
५६(६०) vs इंग्लंड, २०२१
६६(७९)vs इंग्लंड, २०२१
७(१०) vs इंग्लंड, २०२१
१०३ (९७) Vs बांग्लादेश, २०२३

कोहलीच्या एका मैदानावर ५०० अथवा त्यापेक्षा जास्त धावा

८०० – ढाका
६४४ – कोलंबो
५८७ – विशाखापट्टणम
५७१ – पोर्ट ऑफ स्पेन
५५१ – पुणे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -