Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023India vs Bangladesh: कोहलीच्या शतकासाठी सोडल्या एकेरी धावा? राहुलने सांगितले सत्य

India vs Bangladesh: कोहलीच्या शतकासाठी सोडल्या एकेरी धावा? राहुलने सांगितले सत्य

पुणे: भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने(virat kohli) एकदिवसीय करिअरमधील आपले ४८वे शतक झळकावताना भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. एकदिवसीय विश्वचषक २०२३मधील आपल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. पुण्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात २५७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने जबरदस्त शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे. कोहलीने या सामन्यात नाबाद १०३ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट १०६.१८ इतका होता. मात्र सामना रोमांचक तेव्हा झाला जेव्हा विजयासाठी ६६ बॉलमध्ये १९ धावांची गरज होती. तेव्हा कोहली ८१ धावांवर नाबाद खेळत होता.

शेवटच्या १९ धावा बनवण्यासाठी कोहलीकडे होता स्ट्राईक

याचाच अर्थ विजयासाठी आणि कोहलीच्या शतकासाठी एकूण १९ धावांची गरज होती. तेव्हा नॉन स्ट्राईकला केएल राहुल उभा होता. यानंतर भारतीय संघाला विजय मिळवेपर्यंत म्हणजेच पुढील १५ बॉल कोहलीकडे स्ट्राईक राहिला. मध्येच कोहलीने अनेकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र राहुलने नकार दिला. मात्र ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर राहुलने एकेरी धाव घेतली. ज्यामुळे पुढील ओव्हरमध्ये कोहलीकडे पुन्हा स्ट्राईक येईल. यादरम्यान कोहलीला प्रत्येकवेळी धाव घ्यायची होती मात्र राहुल नकार देत होता कारण त्यामुळे कोहलीचे शतक पूर्ण होईल.

तुम्ही आरामात शतक पूर्ण करू शकता

याचा खुलासा राहुलने सामन्यानंतर केला. राहुलने सांगितले की, कोहलीला असे वाटत होते की त्याच्यावर कोणीही शतक पूर्ण करणय्याबाबत आरोप करू नये. मात्र राहुलने त्याला समजावले की आता बॉल खूप आहेत आणि टीम आरामात जिंकू शकते. अशातच तुम्ही शतक पूर्ण करू शकता. मी एकेरी धाव घेण्यास नकार देत होते. विराटने सांगितले होते की जर तु एकेरी धाव घेतली नाही तर ते वाईट असेल. लोक हाच विचार करतील की हा व्यक्तिगत स्कोरसाठी खेळत आहे. मात्र मी सांगितले की आपण आरामात सामना जिंकत आहोत तुम्ही तुमचे शतक पूर्ण करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -