Saturday, July 13, 2024
HomeदेशIndia-Canada Tensions: कॅनडाने ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावले माघारी, भारताने दिला होता देश...

India-Canada Tensions: कॅनडाने ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावले माघारी, भारताने दिला होता देश सोडण्याचा आदेश

नवी दिल्ली: कॅनडाने(canada) भारतातील आपल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्यााचा आरोप भारतावर केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरूवारी अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याबाबतची माहिती दिली. त्यांनी हे ही म्हटले की कॅनडा प्रत्युत्तर कारवाई करणार नाही.

खरंतर, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रत्युत्तर कारवाईचा अर्थ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देश सोडण्याच्या आदेशाबद्दल आहे. परराष्ट्र मंत्री जोली यांनी सांगितले भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांचे राजनैतिक पद्द रद्द केले जाईल.

भारताच्या अधिकाऱ्यांना देश सोडण्यास नाही सांगणार कॅनडा

परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, भारताच्या कारवाईमुळे आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता आम्ही त्यांना भारतातून बोलावले आहे. जर आम्ही राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बनवलेले नियम तोडतो तर जगात कोणतेच राजनैतिक अधिकारी सुरक्षित राहणार आहे. यामुळे आम्ही भारताच्या या कारवाईवर कोणत्याही प्रकारचा प्रतिक्रिया देणार नाही. ज्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांनी भारत सोडला आहे. त्यांच्यासोबत ४२ असे लोक आहे जे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.

भारत-कॅनडा यांच्यातील वादाचे कारण

खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी जूनमध्ये सर्रे शहरातील एका गुरूद्वारात हत्या करण्यात आली. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खालिस्तानी समर्तकांनी कॅनडा सरकारव दबाव आणण्यास सुरूवात केली. त्यांचे म्हणणे होते की या हत्येमागे भारताचा हात आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत येत निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला. तसेच ओटावामधील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले.

भारताने ट्रुडो यांचे हे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. कॅनडाच्या अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना त्यांनी देश सोडण्याचे आदेश दिले. यानंतरच भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढण्यास सुरूवात झाली. यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बातमी आली की भारताने नवी दिल्लीतील कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. भारतात कॅनडाचे एकूण मिळून ६२ राजनैतिक अधिकारी आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -