Sunday, June 22, 2025

AUS vs PAK: रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा विजय

AUS vs PAK: रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा विजय

बंगळुरू: ऑस्ट्रेलिया(australia) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील विश्वचषकाचा १८वा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ६२ धावांनी हरवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३६७ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ३०५ धावांनी ऑलआऊट झाला.


बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बाबर आझमचा हा निर्णय चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्शने २५९ धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला एक चांगली सुरूवात करून दिली.



ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा रिपोर्ट


दरम्यान, त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने शानदार पुनरागमन केले आणि शाहीन शाह आफ्रिदीने पाच विकेट घेतल्या. शाहीनसह पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजांनी शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला ५० षटकांत ९ बाद ३६७ धावा करता आल्या. एक वेळ असा होता की ऑस्ट्रेलियाचा संघ ४०० पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते.


या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा डेविड वॉर्नरने केल्या. वॉर्नरने १६३ धावांची खेळी केली. याशिवाय मिचेल मार्शने १२१ धावांची शतकी खेळी केली. या दोन्हींशिवाय ऑस्ट्रेलियाचा कोणताच खेळाडू २५ धावांची खेळी करू शकला नाही.


दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने सावध सुरूवात केली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांच्यात पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी झाली. शफीकने ६४, इमामने ७० धावांची खेळी केली. या दोन्हीशिवाय मोहम्मद रिझवानने ४६, साऊद शकीलने ३० आणि इफ्तिखार अहमदने २६ धावांची खेळी केली. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.


पाकिस्तानच्या फलंदाजी पाहून असे वाटत होते की त्यांची टीम हे आव्हान सहज पूर्ण करेल. मात्र ऑस्ट्रेलियाचा स्पिनर अॅडम झाम्पाने असे होऊ दिले नाही. अॅडम झाम्पाने १० ओव्हरमध्ये ५३ धावा देत ४ विकेट घेतल्या. यासोबतच पाकिस्तानच्या विजयाच्या स्वप्नावर पाणी फिरले.

Comments
Add Comment