मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना पाहण्यासाठी अहमदाबाद (Ahmedabad) येथे गेली असताना तिचा महागडा फोन चोरीला गेल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. उर्वशीनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media account) यासंबंधी माहिती दिली होती. तिने पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. त्यानंतर आता चोराने थेट उर्वशीला एक मेल केला आहे. त्यात त्याने एक मागणी केली आहे. ती मागणी उर्वशीने पूर्ण केली तर मोबाईल परत करेन असं चोराने या मेलमध्ये म्हटलं आहे.
उर्वशी ही बॉलिवूडच्या सुंदर आणि श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिचा फोनही तितकाच महागडा होता. २४ कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोन (Iphone) ती वापरत होती. हा आयफोन चोरीला गेल्याने तिला धक्का बसला होता आणि तिने सोशल मीडियावर चोरीची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. कोणाला फोन सापडला तर ताबडतोब संपर्क साधा, असे आवाहनही तिने यामार्फत केले होते.
उर्वशीच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, सोबतच फोन चोरी करणार्याने एक मागणीही केली आहे. ग्रो ट्रेडर्स (Groww Traders) या नावाने उर्वशीला मेल आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट (Screenshot) तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की, ‘तुमचा फोन माझ्याजवळ आहे. तुम्हाला फोन परत हवा असेल तर माझी मदत करावी लागेल. माझ्या भावाला कॅन्सर (Cancer) आहे, त्याचा उपचार करा’ असा मेल चोराने केला आहे. चोराच्या या मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्वशीने थम्स-अपच्या इमोजीने रिप्लाय दिला आहे.
सोशल मीडियावर तिने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. आयपी अॅड्रेसच्या मदतीने पोलीस चोराला पकडू शकतात, असे नेटकऱ्यांनी उर्वशीला सांगितले. मात्र, उर्वशीने चोराच्या मेलबाबत पोलिसांना सांगितले की नाही, याबाबत अद्याप कोणताही माहिती नाही.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…