मुंबई : देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी (Narendra Modi) काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर आदरणीय शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी टीका केली. आश्चर्य असं वाटतं की ज्या पवार साहेबांना १९९२ दंगलीच्या काळात जेव्हा बॉम्बब्लास्ट झाले आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं होतं तेव्हा दहशतवादी देशाची कशी वाट लावू शकतात हे त्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तरीही केवळ मतांच्या राजकारणासाठी ते आमच्या पंतप्रधानांवर टीका करत होते, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.
पुढे नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या (INDIA Alliance) कोणालाही आम्ही कुठेही हमासचा निषेध करताना ऐकलेलं नाही. दहशतवाद्यांविरोधात बोलताना आम्ही ऐकलं नाही. म्हणजे मतांच्या राजकारणासाठी किती लाचार व्हायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही. देशामध्ये जे जिहादी विचारांचे लोक आहेत, ते हमासचं समर्थन करतात आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांना पाठिंबा देतात. मी तर असं ऐकलं की तो ओवेसी कार्टा त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील ओवेसींच्या खांद्याला खांदा लावून त्या रॅलीत उद्या दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडुपमध्ये बसून आमच्या पंतप्रधानांना, परराष्ट्र मंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना सल्ले देत होता. वाजपेयी साहेबांचे दाखले देत होता. पण जो बाळासाहेबांचे विचार विसरला आहे, त्यांची हमासविरोधी, दहशतवादाविरोधी भूमिका विसरला आहे, त्याने आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं नितेश राणे यांनी राऊतांना बजावलं आहे.
ठाण्यामध्ये टेंभीनाक्यावर जो नवरात्रौत्सव साजरा होतो त्या ठिकाणी आज रश्मी ठाकरे दर्शनाला गेल्या होत्या. तर तिकडचा फॅन आणि कुलर कोणीतरी बंद केला म्हणून त्यांचा फार जळफळाट झाला, त्यांना चीड आली. तिथले अधिकारी त्यांना घाबरले. उद्धव ठाकरेंना मी आठवण करुन देईन की, २००४ मध्ये रंगशारदाला होणार्या शिवसेनेच्या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे येणार होते, पण त्या ठिकाणी नारायण राणे साहेबांना बसायला देऊ नये म्हणून खुर्ची काढून टाकण्याचे आदेश तुमच्याकडून देण्यात आले होते. असाच प्रकार तुम्ही राज ठाकरे साहेबांसोबत देखील केला. त्यांची खुर्चीच स्टेजवरुन काढून टाकण्यात आली होती. आज तुमच्या बायकोवरही तशीच वेळ आली. त्यामुळे हा नियतीचा खेळ आहे. नियती बरोबर आपल्या पद्धतीने प्रत्येकाला उत्तर देते, असं नितेश राणे म्हणाले.
दिशा सालियन आणि सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी कॅव्हेट दाखल करत आमचीही बाजू ऐकून घ्यावी, असं म्हटलं आहे. यावर नितेश राणे म्हणाले, याला चोर की दाढी में तिनका असं म्हणतात. जर ती आत्महत्या होती तर त्या संदर्भात आदित्य ठाकरेंना इतकी चिंता का वाटते? ते तर तिथे उपस्थित नव्हते. मग तुम्हाला कन्व्हेंट दाखल करावंसं का वाटलं? त्यामुळे आमच्यासारख्या फॅन्सचं म्हणणं आहे की त्यांचा मर्डर झाला होता आणि त्यातील नावं आता हळूहळू आपोआप बाहेर येतील आणि दोघांनाही न्याय मिळेल.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…