मुंबई : कोरोनाच्या काळात (Covid pandemic) तोंडावर मास्क (Mask) लावून फिरताना अक्षरशः नाकी नऊ आले होते. याची सवय नसल्यामुळे ब-याचदा लोकांना श्वास गुदमरल्यासारखं व्हायचं. नंतर सवय झाली आणि कोरोनाचा प्रभावही काही प्रमाणात कमी झाला. लोकांनी मास्क लावणं सोडून दिलं. पण आता पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ आली आहे. मात्र, यावेळेस कोरोना नव्हे तर मुंबईचं प्रदूषित (Pollution) झालेलं (Mumbai bad Weather) वातावरण मास्क लावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
दिल्लीतील (Delhi) हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (Air Quality Index) हा दरवर्षी सगळ्यात जास्त खालावलेला असतो. तिथली प्रचंड लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाचे अनेक प्रकल्प यामुळे दिल्लीची हवा प्रदूषित झाली आहे. या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. मात्र, असं असतानाच मुंबई आणि पुण्याने गुणवत्तेच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकलं आहे. दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११० आहे तर मुंबईच्या बाबतीत तो १४६ इतका वाढला आहे. पुण्याने तर १७८ इतक्या प्रदूषित हवेचा निर्देशांक गाठला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील लोकांना श्वसनाचे विकार जडू नयेत यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे.
मुंबईची हवा सध्या दिल्लीपेक्षाही खराब आहे आणि हवेतील धुलिकणांमुळे सकाळच्या वेळेस दृश्यमानताही प्रचंड कमी होते. सकाळच्या वेळेस धुकं पसरलंय की काय अस वाटत असलं तरी ती प्रदूषणामुळे खराब झालेली हवा आहे. या हवेत जास्त काळ राहिल्यास श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे मास्क लावणे सक्तीचे नसले तरी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा याचा गंभीर त्रास होऊ शकतो.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…