Saturday, May 10, 2025

विदेशमहत्वाची बातमी

Israel Hamas War: बायडेननंतर आज इस्त्रायलला जाणार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

Israel Hamas War: बायडेननंतर आज इस्त्रायलला जाणार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

तेल अवीव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्त्रायलच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक गुरूवारी येथे पोहोचणार आहेत. येथे ते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतील.


बुधवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांची भेट घेतली होती. इस्त्रायल विरुद्ध हमास सुरू असलेल्या युद्धाबाबत महत्त्वाची बोलणी या भेटीदरम्यान झाली. त्यानंतर आज ऋषी सुनक येथे येण्याची शक्यता आहे.



इस्त्रायल-हमास युद्धादरम्यान इरानवर अमेरिकेची कारवाई


इस्त्रायल हमास यु्द्धादरम्यान अमेरिकाने इराणवर नव्या प्रतिबंधाची घोषणा केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन म्हणाले अमेरिकाने इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल तसेच यूएव्हीवर प्रतिबंध घातले आहेत.



१२व्या दिवसांपर्यत ४९७६ लोकांचा मृत्यू


गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या इस्त्रायल-हमास युद्धात तब्बल ४९७६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १७ हजार ७७५ लोक जखमी आहेत. यापैकी इस्त्रायलमधील १४०२ लोकांचा मृत्यू झाला तर ४४७५ लोक जखमी झाले. गाझामध्ये एकूण ३४८८ लोकांचा मृत्यू झाला आहे तर या हल्ल्यात १२ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. वेस्ट बँकमधद्ये ६५ लोकांचा मृत्यू झाला तर १३०० लोक जखमी झालेत. लेबनानमध्ये २१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Comments

pramila sonkusare    October 19, 2023 12:05 PM

Articles are to good

Add Comment