
मुंबई: शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांचा बायोपिक यूटी ६९चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात खुद्द राज कुंद्राने आपली भूमिका बजावली आहे. एक अभिनेता म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. त्यांचा यूटी ६९ हा सिनेमा त्यांनी जेलध्ये घालवलेल्या २ महिन्यांच्या अनुभवावरील आहे.
ट्रेलरमध्ये राज कुंद्रा यांनी जेलमध्ये घालवलेल्या कटू आठवणींची झलक दाखवली आहे. हा सिनेमा शाहनवाज अली यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या ३ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आपला सिनेमा यूटी ६९च्या एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान राज कुंद्रा यांनी सिनेमाच्या विषयाबाबत खुलेपणाने बातचीत केली.
त्यांनी सांगितले की जेलमधील त्यांचे कसे अनुभव आहेत. त्यांनी सांगितले, त्यांच्यासाठी तो जेलमधील काळ किती कठीण होता. अशातच त्यांची पत्नी आणि कुटुंबाने यातून बाहेर काढण्यास मदत केली. ते ६३ दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते.दरम्यान,मी प्रार्थना करतो की हे दिवस कोणाच्याच नशीबी येऊ नयेत.
तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा
तुरुंगात आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाबाबत राज कुंद्रा म्हणाले, जेव्हा तुम्ही ब्रिटीश नागरिकाला एका अशा घटनेत तुरुंगात घेऊन जाता तेव्हा सगळेच हास्यास्पद होते. ज्या पद्धतीने तुम्हाला जेवण दिले जाते. पाणी असलेली डाळ, राहण्याची जागा. माझ्या गुडघ्याला प्रॉब्लेम होता त्यामुळे मला इंडियन टॉयलेटमध्ये बसता येत नव्हते. तेव्हा मला इंग्लिश टॉयलेट दिला जातो. ते इतके भयानक होते. तुम्ही सिनेमात पाहू शकता काय काय घडले होते ते. अमेरिकन जेल आणि सिनेमात जे तुरुंग दाखवतात तसेच तुरुंग नसतात. जेलचा अंधारमय भाग आम्ही पाहिला आहे. इमानदारीने सांगू तर तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा आहे.