World cup 2023: नेदरलँड्सने रचला इतिहास, द. आफ्रिकेवर ३८ धावांनी विजय

धरमशाला: क्रिकेटच्या मैदानावर कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कधी कधी बलाढ्य वाटणारा संघ एखाद्या दुबळ्या संघासमोर कमकुवत ठरतो. असेच काहीसे आजच्या धरमशाला येथील नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात पाहायला मिळाले.


विश्वचषकात आज दुसऱ्यांदा धक्कादायक निकालाची नोंद झाली. सोमवारी अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघादरम्यानच्या सामन्यात इंग्लंडचा धक्कादायक पराभव झाला. तर आजच्या सामन्यात दुबळ्या नेदरलँड्सने द. आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला.


विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला नेदरलँड्सने रोखले. नेदरलँड्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद २४५ इतकी धावसंख्या साकारली होती. नेदरलँड्च्या कर्णधाराने सातव्या स्थानावर नाबाद ७८ धावांची खेळी केली. यामुळे नेदरलँड्सला अडीचशे धावांच्या नजीक पोहोचता आले.


आपल्या संघातील फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना सातव्या स्थानावर खेळण्यासाठी आलेला नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्डने नाबाद ७८ धावांची चिवट खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड्सने ८२ धावांवर आपले ५ गडी गमावले होते. तेव्हा असे वाटत होते की हा संघ दीडशे धावांचा स्कोर तरी करतो की नाही. मात्र स्कॉट एडवर्ड्स आणि रॉल्फ वान डर मर्व यांनी आठव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचत डावच पलटला.


दुसरीकडे आफ्रिकेच्या संघाला ५० षटकांत अवघ्या २४५ धावाही साकारता आल्या नाहीत. त्यांचा संपूर्ण संघ २०७ धावांवर बाद झाला. आफ्रिकेच्या डेविड मिलरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी साकारली. बाकी फलंदाज चांगली खेळी करण्यात साफ अपयशी ठरले.

Comments
Add Comment

IND vs SL: श्रीलंकाने जिंकला टॉस, टीम इंडिया करणार फलंदाजी

दुबई: आशिया कप २०२५मधील १८व्या सामन्यात आज भारत आणि श्रीलंका यांच्यात टक्कर आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सुपर

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि

IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११

Asis Cup 2025: आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे हे...भारताविरुद्ध खेळणार हा संघ

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करत अंतिम

बिग बॅश लीगमध्ये रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार

कॅनबेरा : अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळणार आहे. या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर