Friday, October 11, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023PAK vs AUS: विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचे टेन्शन वाढले, अनेक खेळाडूंना व्हायरल इन्फेक्शन

PAK vs AUS: विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचे टेन्शन वाढले, अनेक खेळाडूंना व्हायरल इन्फेक्शन

नवी दिल्ली: भारताच्या यजमानपदाखाली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ खेळवली जात आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे पाकिस्तानचा क्रिकेट संघ अडचणीत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या संघाच्या कॅम्पवर व्हायरल इन्फेक्शनचा हल्ला झाला आहे. यामुळे अनेक खेळाडू आजारी पडले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हायरल इन्फेक्शनमुळे पाकिस्तानी संघातील अनेक खेळाडूंची तब्येत बिघडली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ३ वनडे सामने खेळले आहेत यातील दोन सामन्यांत त्यांना विजय मिळाला तर एका सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. हा सामना भारताविरुद्ध होता ज्यात त्यांना पराभव सहन करावा लागला.

पाकिस्तानचा चौथा सामना आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगत आहे. हा सामना २० ऑक्टोबरला बंगळुरूच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याआधी पाकिस्तानचे अधिकाधिक खेळाडू आजारी पडल्याने त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वात खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ आपला पुढील सामना खेळण्यासाठी बंगळुरूमध्ये पोहोचली आहे. संघासाठी चांगली बाब म्हणजे अधिकतर खेळाडू इन्फेक्शन झाल्यानंतर बरे झाले आहेत. सध्या ३ खेळाडू आजारी आहेत. यात स्टार खेळाडू अब्दुल्ला शफीक, शाहीन शाह अफ्रिदी आणि उसामा मीर यांचा समावेश आहे. यांना ताप आला आहे.

पाकिस्तानच्या संघाने या विश्वचषकातील पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेला हरवले. मात्र त्यानंतर १४ ऑक्टोबरला भारताविरुद्ध पाकिस्तानला ७ विकेटनी पराभव सहन करावा लागला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी सध्या काही दिवस बाकी आहेत. अशातच टीम मॅनेजमेंट बाकी खेळाडू लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -