Ashish Shelar : बाळासाहेबांच्या सुपुत्राने काय करुन दाखवलं?

'गर्व से कहो हम हिंदू हैं' म्हणणारे उद्धव ठाकरे आता म्हणू लागले 'गर्व से कहों हम समाजवादी हैं'


आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर कडक शब्दांत टीका


मुंबई : काँग्रेससोबत (Congress) जाण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन आणि शरद पवारांना (Sharad Pawar) मैद्याचं पोतं म्हणत शेवटपर्यंत ज्वलंत हिंदुत्वाचे विचार मांडणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सुपुत्राने काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत हातमिळवणी करुन हिंदुत्वाला तिलांजली देण्याचं काम करुन दाखवलं, अशी उपहासात्मक टीका करत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आतापर्यंतच्या भूमिकांवर कडक शब्दांत फटकारले आहे.


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल समाजवादी पक्षाशी (Samajwadi Party) युती केली. बाळासाहेबांनी कायम ज्या पक्षांना आपला विरोध दर्शवला त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत असं मिरवणारे उद्धव ठाकरे किती खरे राहिले आहेत याची काल प्रचिती आली. यामुळे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. 'अन्न भेसळीप्रमाणे यांच्या हिंदुत्वात मिलावट आहे', अशी बोचरी टीका काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. तर आता आशिष शेलार यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर कडक शब्दांत टीका केली आहे.

आमदार आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं? असा सवाल उपस्थित करत त्यांनी लिहिले आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं!, श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले!, राम मंदिरावर टीका करुन दाखवली!, हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली!, छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले!, छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले!, वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं!, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.


पुढे शेलार यांनी लिहिले आहे, 'गर्व से कहो हम हिंदू हैं' म्हणणारी शिवसेना आता 'गर्व से कहों हम समाजवादी हैं' म्हणू लागली..! भविष्यात कदाचित 'गर्व से कहो हम MIM हैं' सुध्दा म्हणू लागतील! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना चपराक लगावली आहे.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून