Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखNavratri nine days : नवरात्रीतल्या नऊ दिवसांची अशी ही महती

Navratri nine days : नवरात्रीतल्या नऊ दिवसांची अशी ही महती

श्री. देविदास पावशे शास्त्री, गोराई-२. बोरिवली, (प.)

नवरात्र/घटस्थापना रविवार १५ ऑक्टोबर रोजी सुरू झाली व सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २३ रोजी संपतेय. नंतर २४ ऑक्टोबरला दसरा आहे. या नवरात्रोत्सव कालावधीत देवी महात्म्य, धार्मिक विधींबाबत सर्वसामान्य नागरिकांना जिज्ञासा आहे. या नवरात्रीतील दिवसाचे महत्त्वही जाणून घेता येईल.

 • नवरात्रीचे प्रकार; कोणत्या दिवशी कसे सुरू करावेत.
 • सप्तरात्रोत्सव दि.१७ पासून
 • पंचरात्रोत्सव दि.१९ पासून
 • त्रिरात्रोत्सव दि.२१ पासून
 • एक रात्रोत्सव दि.२२ रोजी
 • ललिता पंचमी दि. १९ रोजी
 • घागरी फुंकणे दि.२१ ला आहे
 • महा अष्टमीचा उपवास दि.२२ ला तर महा नवमीचा उपवास दि.२३ ला
 • नवरात्र सांगता दि.२३ ऑक्टोबरला आहे /घट उठविणे…

नवरात्रीची ४ प्रमुख अंगे आहेत
१) देवता स्थापन २) मालाबंधन
३) अखंड नंदादीप ४) कुमारिका पूजन..

नवरात्र बसवल्यावर ज्या देवतेचे ‘नवरात्र’ असते त्या देवतेची पूजा करताना देवाचा / देवीचा टाक न हलवता फुलांनी किंचित पाणी शिंपडून, रोज फुले बदलून पूजा करावी. तर इतर देव नेहमीप्रमाणेच ताम्हणात घेऊन दूधपाणी घालून रोजच्यासारखी पूजा करावी, मात्र काही लोक नवरात्र बसविल्यावर इतर देवांचीही पूजा करीत नाहीत, देव हलवित नाहीत हे शास्त्राला धरून नाही. हा समज निव्वळ चुकीचा आहे.

प्रकृती खराब असेल – झेपणार नसेल तर वयोमानापरत्वे शक्य नसेल तेव्हा नवरात्र बसवितानाचा पहिला दिवस व शेवटचा दिवस (उठता-बसता) असे २ व नवमीचा १ असे ३ दिवस उपवास केला तरी चालतो किंवा फक्त अष्टमीचाही उपवास करता येईल आणि नवमीस धान्य फराळ (भाजके अन्न) करावा.

नवरात्रात ‘अखंड नंदादीप’ लावला जातो. त्यावर काजळी आल्यावर तो विझतो अगर वाऱ्याने, हवेने विझतो / मालवतो, ते अशुभ नाही. कुठलीही शंका न घेता दिव्याची वात स्वच्छ करून काजळी काढून वा बदलून तो परत लावावा ते आत १-२ कापराच्या वड्या बारीक करून टाकल्या तर काजळी येत नाही आणि वात मंद व शांत जळत राहील व प्रकाशही स्वच्छ पडेल.

देवीस बाहेरून वस्तू आणून वाहतांना स्वच्छ करून वाहाव्यात(जसे फुले,तुळशीपत्र, दुर्वा, इत्यादी). शक्यतो घरात तयार केलेलेच पदार्थ नैवेद्यास ठेवावेत श्रध्देने. आत्मसमर्पणाने, आनंदाने उत्सव साजरा करावा. म्हणजे त्याचे चांगले फळ मिळते.

अष्टमीचे पूजनासाठी रात्रौ १२ ते १ ही वेळ घ्यावी. कारण त्या आधी कधी – कधी सप्तमी असू शकते. दसरा (विजया दशमी) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने तो शुभ मानतात. पण त्या दिवशी विवाह – वास्तू निक्षेप/शांती इ.शुभ कामे करू नयेत. कारण अश्विन महिना हा त्यासाठी त्याज्य आहे. मात्र वाहन खरेदी, घर खरेदी,कलशपूजन इ.करू शकता.

* नवरात्र म्हणजे ९ दिवस असते असे नाही. काळ्या मातीत सप्त धान्य हळदीच्या पाण्यात बुडवून पेरावेत. घट बसविल्यावर रोज सुवासिक फुलांची माळ बाधांवी. शक्यतो परान्न (दुसऱ्याचे घरी) घेऊ नये. ब्रम्हचर्य पालन करावे. पलंग, गादी, दाढी, कटिंग वर्ज्य करावे.

नवरात्रात नवदुर्गा ९ आहेत त्याप्रमाणे रोज एकीचे पूजन केले जाते त्या अशा आहेत.

 • शैलपुत्री
 • ब्रह्मचारिणी
 • चंद्रघंटा
 • कुष्मांडा
 • स्कंदमाता
 • कात्यायनी
 • कालरात्री
 • महागौरी
 • सिद्धीधात्री

रोज एका कुमारीकेस वाढत्या वयाच्या क्रमाने बोलावून तिचे पाद्यपूजा, दुग्धपान, फलाहार, अल्पोपहार देऊन शेवटचे दिवशी जेवण – वस्त्र – अलंकार-उपयोगी वस्तू देऊन पुजन करून आशीर्वाद घ्यावेत.

स्कंद पुराणात वयानुसार कुमारिका पूजन व त्याचे फळ सांगितले आहे. देवी व्रतांमध्ये कुमारिका पूजन परमावश्यक आहे / असते.

 • वर्षाची कुमारिका.
  फळ: मोक्ष व भोग प्राप्ती.
 • वर्षाची कुमारी.
  फळ: ऐश्वर्य प्राप्ती
 • वर्षाची त्रिमूर्तीनी
  फळ : धर्म, अर्थ, काम,मोक्ष
 • वर्षांची कल्याणी
  फळ : राज्यपद प्राप्ती
 • वर्षांची रोहिणी
  फळ : विद्या प्राप्ती
 • वर्षांची काली
  फळ : षट्कर्म सिद्धी
 • वर्षांची चंडिका
  फळ : राज्य प्राप्ती
 • वर्षांची शांभवी
  फळ : संपत्ती प्राप्ती
 • वर्षांची दुर्गा
  फळ : पृथ्वीवरील राज्य
 • वर्षांची सुभद्रा
  फळ : मने इच्छा प्राप्ती.

* प्रत्येकवारी कोणता नैवेद्य दाखवावा ते देवी भागवतात सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे असे…

 • रविवारी …पायस (खिर)
 • सोमवारी …शुद्ध तुप
 • मंगळवारी …केळी
 • बुधवारी …लोणी
 • गुरुवारी …खडीसाखर
 • शुक्रवारी …साखर
 • शनिवारी …साजूक तूप.

बऱ्याच ठिकाणी सप्तशती पाठ करण्याची पद्धत आहे. ते कोणत्या कार्यासाठी किती करावेत ते असे.
फल सिद्धीसाठी … १ पाठ
उपद्रव शांतीसाठी … ३ पाठ
भयमुक्तीसाठी …७ पाठ
यज्ञफल प्राप्तीसाठी …९ पाठ
राज्य प्राप्तीसाठी …११ पाठ
कार्य सिद्धीसाठी …१२ पाठ
सुख संपत्तीसाठी …१५ पाठ
बंध मुक्तीसाठी …२५ पाठ
प्रिय व्यक्ती प्राप्ती … १८ पाठ
अनिष्ट ग्रह निवारण …२० पाठ
▪शत्रू, राजा,रोग,भय …१७ पाठ
▪पुत्र,धन प्राप्तीसाठी …१६ पाठ
▪एखाद्याला वश करणे …१४ पाठ
▪सामान्यतः सर्व प्रकारच्या शांतीसाठी …५ पाठ

 • नवरात्रात कोणते रंग परिधान करावेत. याला धर्मशास्त्रात कुठलाही आधार नाही व उल्लेखही नाही. कारखानदार, दुकानदार, मीडियावाले यांचे हे जाहिरातीचे फंडे आहेत.
 • नवरात्र बसविल्यावर समजा घरात सुतक/ वृद्धी आली तर सप्तशती पाठ थांबवून सुतक संपल्यानंतर राहिलेले पाठ पूर्ण करावेत, मात्र नवरात्र उपवास चालू ठेवावेत व माळ/दिवा इत्यादी शेजारच्यांकडून अथवा ब्राह्मणाकडून, लांबच्या नातेवाइकांकडून करावे आणि घरातील साहित्य वापरू नये.
 • नवरात्रीच्या आधीच असा प्रसंग आला तर मात्र १३ वा /१५वा झाल्यावर उरलेल्या दिवशी नवरात्र बसवता येईल, जसे …७-५-३ व १ दिवसाचे बसवता येईल. त्या नवरात्राला… सप्तरात्रोत्सव (७ दिवसांचे) …पंचरात्रोत्सव (५ दिवसांचे), त्रिरात्रोत्सव (३ दिवसांचे), एक रात्रोत्सव (१ दिवसाचे) अशा पद्धतीने करता येईल तसे दिवस मोजून कसे बसवता येईल ते बघावे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -