MHADA Konkan Division : ठाणे, पालघरमध्ये म्हाडाचे घर घ्यायचेय? अर्जाची मुदत वाढवली... 'या' तारखेला होणार सोडत

जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार अर्ज?


मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या (MHADA Konkan Division Houses Lottery) वतीने ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच हजार ३११ सदनिकांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. १५ सप्टेंबरपासून याची अर्जविक्री सुरु करण्यात आली होती तर १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पाच हजार ३११ सदनिकांसाठी अर्जांचा दहा हजाराचा टप्पा ओलांडण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे म्हाडाकडून अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.


म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अर्जविक्री- स्वीकृतीला एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार, आता सोडतीसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच, १३ डिसेंबरला सोडत काढली जाणार आहे. कोकण मंडळाच्या मे महिन्याच्या सोडतीतील शिल्लक आणि इतर उपलब्ध घरांसाठी सप्टेंबरमध्ये सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. १५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली तर १८ ऑक्टोबरला मुदत संपणार होती. त्यामुळे ७ नोव्हेंबर या तारखेला सोडत काढण्यात येणार होती.


मात्र, अनामत रकमेसह दाखल झालेल्या अर्जांची संख्या दहा हजारांच्या पार जाण्याचीही शक्यता धूसर आहे. त्यामुळे कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. शुक्रवारी या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता मुदतवाढीची तारीख १८ नोव्हेंबर तर सोडतीची तारीख १३ डिसेंबर ठरवण्यात आली आहे.



ऑनलाईन अर्जप्रक्रियेसाठी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका


नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून म्हाडाकडून सहजरित्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय प्रणाली अर्जदारांसाठी अँड्रॉइड (Android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध आहे. ॲन्ड्रॉईड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राईव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, एव्ही आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका नीट वाचावी, असं आवाहन कोकण मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे.



घरांची विक्री होत नसल्याने म्हाडा प्राधिकरणाच्या चिंतेत वाढ


पंतप्रधान आवास योजनेतील आणि विरार-बोळींज येथील मंडळाच्या घरांची विक्री होत नसल्यानं म्हाडा प्राधिकरणाची चिंता वाढली आहे. तर, आर्थिक अडचणीही निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता मंडळ सोडतीच्या मुदतवाढीच्या कालावधीत घरं विकण्यासाठी विविध योजना आखणार आहे. सोडतीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तर, विविध माध्यमातून सोडतीची प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह