Toll naka Scam : राज्य सरकारचे कॅमेरे लागले आता दोन दिवसांत आमचेही लागतील

टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन मनसेचा इशारा


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलच्या झोलची (Toll scam) जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जातो या विधानाला विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची टोल प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भेट घेतली आणि सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यात आला. टोल आकारणीबाबत अनेक सकारात्मक निर्णय यावेळेस घेण्यात आले.


टोलनाक्यांवरुन दिवसभरात किती वाहनांची ये-जा होते यावर सरकारच्या कॅमेर्‍यांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे, असाही एक निर्णय घेण्यात आला. पण यासोबतच मनसेही आपल्या कॅमेर्‍यांद्वारे या गाड्यांवर लक्ष ठेवेल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला. राज्य सरकारने राज्यातील मुख्य टोलनाक्यांवर काल रात्री कॅमेरे लावले आहेत. तर आता पुढच्या दोन ते तीन दिवसांत मनसेचेही कॅमेरे लागतील, त्याच्यानंतर टोल नाक्यांवरील गाड्या मोजायचं काम अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होईल, असं मनसेतर्फे सांगण्यात आलं आहे.


राज्य सरकार टोल घेणार असेल तर लोकांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होतेय का हे पाहण्यासाटी मनसेकडून टोल नाक्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्या माध्यमातून टोल नाक्यावरून किती गाड्या जातात हे कळेल. तसेच टोलनाक्यांवर लावलेल्या कॅमेर्‍यांचं कंट्रोल मंत्रालयात असणार आहे, त्यामुळे तिथे लोकांना काय त्रास होतोय ते कळेल. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य