Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडी

Magna Elephant: सरकारी नोकरी करत होता हत्ती, मृत्यूनंतर श्रद्धांजली देण्यासाठी शेकडोंची गर्दी

Magna Elephant: सरकारी नोकरी करत होता हत्ती, मृत्यूनंतर श्रद्धांजली देण्यासाठी शेकडोंची गर्दी

चेन्नई: तामिळनाडूच्या कृष्णगिरी आणि धर्मपुरी जंगलामध्ये मॅग्ना हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. हे हत्ती जेवण आणि पाण्याच्या शोधात ग्रामीण भागांमध्ये येतात. मॅग्ना हत्ती हे काही प्रमाणात आक्रमक प्रवृत्तीचे मानले जातात. मात्र मुदुमुलाई टायगर रिझर्व्ह येथून गेल्या वर्षी सरकारी नोकरीतून रिटायर झालेल्या मॅग्ना हत्तीची गोष्ट काही वेगळीच आहे. शनिवारी १४ ऑक्टोबरला या हत्तीचा मृत्यू झाला. त्याला श्रद्धांजली देण्यासाठी शेकडो लोकांनी यावेळी गर्दी केली होती.


वृत्त एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार मुदुमलाई टायगर रिझर्व्हच्या डेप्युटी डायरेक्टर विद्या यांचे म्हणणे आहे की मॅग्ना हत्तीला १९९८मध्ये पकडण्यात आले होते. यानंतर हा हत्ती शिबिरात राहत होता. या हत्तीवर सर्व प्रकारच्या ऑपरेशनचे प्रयोग केले जात असता. गेल्याच वर्षी हा हत्ती सरकारी सेवेतून निवृत्त झाला होता.



५८ वर्षीय हत्ती रिटायर झाल्यानंतर खराब होती तब्येत


डेप्युटी डायरेक्टरच्या मते हत्तीचे वय साधारण ५८ वर्षे होते. गेल्या वर्षी रिटायर झाल्यानंतर त्याची तब्येत ठीक नव्हती. तब्येत अधिक बिघडल्याने शनिवारी हत्तीचा मृत्यू झाला.


 




असे असतात मॅग्ना हत्ती


वयस्कर आणि दात नसलेल्या हत्तींना मॅग्ना हत्ती म्हटले जाते. हे हत्ती साधारणपणे तामिळनाडूमध्ये आढळतात. ज्या हत्तींना दात असतात ते नर असतात तर ज्यांना दात नसतात त्या हत्ती मादी असतात. मात्र मॅग्ना हत्ती असे असतात की जे नर असतात मात्र त्यांना दात नसतात. दरम्यान, हे शांत स्वभावाचे असतात मात्र जेव्हा ते आक्रमक होतात तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण असते.

Comments
Add Comment