दिवाळीत नागराज मंजुळे घेऊन येताहेत ‘नाळ २’

‘नाळ’च्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ‘नाळ भाग २’. सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ’ या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडली गेली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव कोरले. सुधाकर यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्णपदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाने दिवाळीतही चित्रपटगृहात ‘हाउसफुल्ल’चे बोर्ड झळकवले होते. चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या.


‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्याने तर प्रेक्षकांवर जादूच केली. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘चैत्या’च्या त्या निरागस भावविश्वात नेण्यासाठी सुधाकर रेड्डी यक्कंटी सज्ज झाले आहेत. ‘नाळ भाग २’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला परत एक ‘सुपरहिट’ सिनेमा मिळतोय का हे पाहायचेय. नुकतेच ‘नाळ भाग २’चे टिझर सोशल मीडियावर झळकले आहेत. टीझरमधील छायाचित्रण बघून ‘नाळ २’ही कमाल करणार यात शंकाच नाही. येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी हा ‘नाळ २’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच धमाकेदार असणार आहे.


आई - मुलाच्या नात्यातील खूप साधी अशी ही गोष्ट होती. आता हीच गोष्ट पुढे जाणार आहे. ‘नाळ २’ ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा आहे. नागराज मंजुळे हा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता या सगळ्याच भूमिकेत अव्वल आहे. तसेच झी स्टुडिओजबद्दल सांगायचे, तर त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

‘अलिन’ आशेचा एक दीप !

“केरळमधील दहा महिन्यांची अलिन वयाने सगळ्यात लहान असलेली डोनर आहे. आपलं मूल हे आईचं काळीज असतं. मुलीच्या

‘ना समझे वो अनाडी हैं!’·

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दोबिघा जमीन’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वयाच्या ३१व्या वर्षी करिअर सुरू

चिरेबंदी वाड्यातले बालपण

स्मृतीगंध : लता गुठे आमचं साधारण पाच हजार लोकवस्तीचं गाव. नगर जिल्ह्यातल्या बॉर्डरवर असलेलं, नाव भालगाव. अतिशय

माणसातला देव, देवातला माणूस

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे बाबांचे जन्मगाव. २३ फेब्रुवारी १८७६ या दिवशी ईश्वराने

चैतन्य

जीवनगंध : पूनम राणे गावात देवीचा वार्षिक उत्सव होता. या उत्सवाच्या निमित्ताने गावातून शहराकडे गेलेल्या अनेक

लग्नाला होकार आणि आयुष्य नरकासमान...

क्राइम : अॅड. रिया करंजकर प्राचीन काळामध्ये बालविवाह हा विवाहाचा प्रकार चालत होता. मुलं सज्ञान होण्याच्या आतच