Mega Block Update : मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक!

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलच्या मध्य रेल्वे (CR), पश्चिम रेल्वे (WR) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (HR) रविवार १५ ऑक्टोबर रोजी अभियांत्रिकी आणि दुरूस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


या ब्लॉकच्या काळामध्ये तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावतील. तसेच मध्य रेल्वेवर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्गावर प्रवास करणार्‍यांना ब्लॉक दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मरेची मुख्य लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.


रविवारी मध्य रेल्वे मार्गावर दुपारी १ ते ४ या वेळेत मेगाब्लॉक आहे. या वेळेत ठाणे – कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाड्या १५-२० मिनिटं उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक हा सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.४० पर्यंत असणार आहे. सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सकाळी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी लोकल रद्द असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव आणि १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत गोरेगाव/वांद्रे ते सीएसएमटी वाजेपर्यंत लोकल रद्द केल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा धावतील.


पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक असल्याने सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.


बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. तसेच काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी