मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलच्या मध्य रेल्वे (CR), पश्चिम रेल्वे (WR) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (HR) रविवार १५ ऑक्टोबर रोजी अभियांत्रिकी आणि दुरूस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या ब्लॉकच्या काळामध्ये तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावतील. तसेच मध्य रेल्वेवर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्गावर प्रवास करणार्यांना ब्लॉक दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मरेची मुख्य लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
रविवारी मध्य रेल्वे मार्गावर दुपारी १ ते ४ या वेळेत मेगाब्लॉक आहे. या वेळेत ठाणे – कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाड्या १५-२० मिनिटं उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक हा सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.४० पर्यंत असणार आहे. सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सकाळी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी लोकल रद्द असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव आणि १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत गोरेगाव/वांद्रे ते सीएसएमटी वाजेपर्यंत लोकल रद्द केल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा धावतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक असल्याने सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. तसेच काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…