प्रमोद दंडगव्हाळ
सिडको : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, नाशिकचे भूषण, प्रसिद्ध कवी, गीतकार आणि शाहीर कै. वामनदादा कर्डक यांना मराठवाड्यातील एमजीएम विद्यापीठाने मरणोत्तर डी.लीट पदवी प्रदान केल्याने नाशिककरांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कै. वामन दादांना मरणोत्तर डी.लिट पदवी संभाजी नगर येथे मोठ्या समारंभात ही पदवी बहाल करण्यात आली.
याप्रसंगी वामनदादा कर्डक यांचे सुपुत्र व युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आयु. रविंद्र वामन कर्डक, कु. कोमल कर्डक, आयु. मधुकर कर्डक, आयु. अशोक नवतुरे, आयु. राजानंद नवतुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशवंडी, तालुका सिन्नर येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी जन्मलेले वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी २०२२ मध्ये झाली. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मरणोत्तर मानाचा सन्मान मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही आनंदाचीच बाब म्हणावी लागेल. शिक्षणाचा गंधही नसलेले वामनदादा कर्डक यांनी सुरुवातीच्या काळात अनेक हालअपेष्टा भोगल्या. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. अनेक नोकऱ्या केल्या. परंतु कशातच त्यांचे मन रमले नाही. साधी अक्षर ओळख नसतानाही नंतर बाराखडी व जोडाक्षरे शिकून त्यांनी साहित्यिक क्षेत्रात जे नाव कमावले. त्याला निश्चितच तोड नाही.
आंबेडकरी विचार हा त्यांचा श्वास होता. आपल्या ओजस्वी वाणीतून आणि दमदार लिखाणाद्वारे त्यांनी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविले. त्यांच्या गीतांचा संपूर्ण महाराष्ट्र दिवाना होता. ते अशिक्षित असले तरी त्यांनी १० हजाराहून अधिक गीते लिहिली. विशेष म्हणजे ती सर्वत्र लोकप्रिय झाली. त्यांच्या साहित्यांवर अनेकांनी पीएचडी करून विद्यावाचस्पती होण्याचा बहुमान मिळवला यातच सारं काही आलं.
दादांना पंधराहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. १९८५ साली त्यांनी नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. चल ग हरणे तुरु तुरु.., ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा..’ ही त्यांनी लिहिलेली गाणी अजरामर झाली.
वामनदादा कर्डक यांच्यासारख्या व्यक्तीला मरणोत्तर डी.लीट पदवी जाहीर केली. हा त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरवच म्हणावा लागेल.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…