परमेश्वराची जी सत्ता आहे ती तुमच्या डोळ्यांना दिसत नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला ही सत्ता दिसली पाहिजे, तर तो दिसण्याचा विषयच नाही. तो कुठल्याही इंद्रियांना आकळता येत नाही. सत्ता म्हणजे निव्वळ अस्तित्व. सत्ता या शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. सत्ता म्हटली की, तिथे शक्ती पण येते. सत्ता व शक्ती या दोन्ही गोष्टी येतात. विजेच्या ठिकाणी शक्ती आहे. तिच्या शक्तीमुळे व अस्तित्वामुळे हे सगळे चालते. शक्ती व अस्तित्व या दोन भिन्न गोष्टी नाहीत, तर एकच आहेत. सत्ता म्हणजे सातत्य. सतत असणेपणाचे पद. सातत्याने असणे म्हणजे सत्. सत् या शब्दात सत्ता व शक्ती हे दोन्ही अर्थ येतात.
तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया सत्ते
ऐसा तू समर्थ ब्रह्माण्डाचा स्वामी, वर्म हे जाणोनि शरण आलो.
हे नामदेव महाराजांचे वचन आहे. नामदेव महाराज काय सांगतात? हे वर्म आहे, हे वर्म तुम्हाला समजले पाहिजे. हे वर्म काय आहे? परमेश्वराच्या सत्तेने हे सर्व चाललेले आहे हे समजले, तर परमेश्वराची सत्ता आहे ती आपल्या अनुभवाला येते. विजेचा अनुभव घेतो की नाही. परमेश्वराच्या सत्तेचाही आपण अनुभव घेत असतो. हे विश्व म्हणजे त्याचेच प्रकटीकरण आहे. वीज व परमेश्वर यांत फरक आहे, उदाहरण दिले, तरी ते पूर्ण समर्पक नाही. विजेच्या ठिकाणी सत्ता व शक्ती या दोन्ही जरी असल्या तरी त्या ठिकाणी जाणीव नाही, प्रज्ञा नाही, आनंद नाही, सच्चिदानंद स्वरूपही नाही. परमेश्वर या सगळ्यांनी युक्त आहे. विजेचे उदाहरण मर्यादित आहे. मी नेहमी सांगतो कि सिद्धांत आणि दृष्टांत यांत दृष्टांत हा कधीही परफेक्ट नसतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. विद्वानांच्या ही हे लक्षात येत नाही. सिद्धांत व दृष्टांत हे कधीही अगदी समर्पक नसतात. पण अशा दृष्टांतामुळेच आपल्याला अध्यात्मशास्त्रातील विषयांचे आकलन होते व त्यातूनच अध्यात्मशास्त्र शिकून आपल्या जीवनातील फार मोठे गुह्य आकाळणे शक्य होते. यासाठी आवश्यकता असते ती खरे सद्गुरू भेटण्याची. कारण तेच साधकाला या महान गुन्ह्याची उकल कशी करायची, त्याचे स्पष्ट मार्ग दाखवतात.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…