अहमदाबाद: विश्वचषकाची सुरूवात होऊन आठवडा झाला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकातील आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारताने शानदार विजय मिळवला. भारतीय संघ आता विश्वचषकातील तिसरा सामना खेळण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.
१२ ऑक्टोबरला भारतीय संघाने दिल्लीवरून अहमदाबादसाठी उड्डाण केले. काही तासांतच भारतीय संघ गुजरातमध्ये पोहोचला. भारत आणि पाकिस्तानचा संघ १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमनेसामने असणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादेत पोहोचली आहे.
Team India have arrived in Ahmedabad. pic.twitter.com/21LNLBbYIS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2023
एका क्रिकेट चाहत्याने ही माहिती सोशल मीडियावरून दिली. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. भारताने आतापर्यंतचे दोनही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.
भारत आणि पाकिस्तानचचा संघ एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानचा संघाला एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकदाही भारताला हरवता आलेले नाही. १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात काय निकाल लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही संघादरम्यान कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. दोन्ही संघातील खेळाडू शानदार फॉर्मात आहेत.