Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

S Jaishankar: एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, दिली झेड दर्जाची सुरक्षा

S Jaishankar: एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, दिली झेड दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना वाय दर्जाऐवजी झेड दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.


आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. याआधी परराष्ट्र मंत्र्यांना दिल्ली पोलीस कमांडोकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.


न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, सूत्रांच्या मते केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाला एस जयशंकर यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. ६८ वर्षीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाय दर्जाच्या सुरक्षा घेऱ्यात दिल्ली पोलिसांची एक सशस्त्र टीम करत होती.


सूत्रांच्या माहितीनुसार आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सीआरपीएफकडून झेड दर्जाची सुरक्षा दिली जाईल. यात देशभरताली शिफ्टमध्ये चोवीस तास त्यांच्यासोबत १४-१५ सशस्त्र कमांडो असतील. सीआरीएफचे व्हीआयपी सुरक्षा कव्हरमध्ये सध्या १७६ दिग्गज आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment