Metro 6 Car shed : मेट्रो-६ साठी कांजूरमार्ग कारशेडला मान्यता

कुठून कुठपर्यंत असणार ही मार्गिका?


मुंबई : गेल्या काही वर्षांपासून वादात असणार्‍या मेट्रो-६ साठी कारशेडचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या महायुती सरकारने कांजूरमार्ग येथील (Kanjurmarg) कांजूर येथे मेट्रो ६ साठी कारशेड (Carshed) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने ५०६ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.


कांजूरमार्ग कारशेडसाठी राज्य सरकारच्या सूचनेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता मेट्रो सहा मार्गिकेसाठी कारशेड उभारण्याचं काम जलद गतीने सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये स्टॅबलिंग यार्ड, वर्कशॉप, मेंटेनन्स लाईन, ऑटोमॅटिक ट्रेन वॉशिंग सुविधा, डेपो कंट्रोल सेंटर, प्रशासकीय कार्यालय, कर्मचारी निवासस्थान, देखभाल आणि कार्यशाळा इमारती आणि सबस्टेशन यांचा समावेश असणार आहे. कॉन्ट्रॅक्टरला इरादा पत्र प्राप्त झाल्यानंतर, प्रकल्प ३० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणं अपेक्षित आहे.


मेट्रो ६ मार्गिका ईस्टर्न आणि वेस्टर्न मार्गांना जोडणार असून ती स्वामी समर्थ मार्ग ते जोगेश्वरीपर्यंत असणार आहे. या मार्गिकेची एकूण लांबी १५.३१ किमी असून १३ स्थानकांचा समावेश असणार आहे. यासाठी सुमारे ६७७२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मेट्रो ६ ही मेट्रो २ अ, मेट्रो ७, मेट्रो ३, मेट्रो ४, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांना जोडणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान