
नांदगाव : नांदगाव येथील रेल्वेच्या रनिंग रूममध्ये पाच फुटाचा कोब्रा आढळल्याने एकच धांदळ उडाली. परंतू कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखून सर्पमित्राला बोलावल्याने कर्मचारी सर्पदंश होता होता वाचले.
नांदगाव रेल्वे रनिंगरूम मध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास येथील एका रूम मध्ये मोठा साप जाताना त्यांना दिसला. त्यांनी स्थानिक सर्पमित्र विजय बडोदे यांना दूरध्वनीवर संपर्क केला. सर्पमित्र विजय बडोदे हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना रनिंग रूमच्या एका खोलीत सामानाखाली साडेपाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप आढळून आला.
बडोदे यांनी सतर्कतेने पकडून त्याला डब्यात बंद केले व येथील रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांना भयमुक्त केले. याबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. बडोदे यांनी कोब्रा जातीच्या सापाला लांब जंगलात नेऊन निसर्गाच्या स्वाधीन केले.