नवी दिल्ली: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) आज भारतीय संघ अफगाणिस्तानच्या संघाविरुद्ध मैदानात उतरत आहे. दरम्यान, त्यांच्या प्लेईंग ११मध्ये एक मोठा बदल दिसू शकतो. टीम इंडिया आर अश्विनला बेंचवर बसवून या सामन्यात शार्दूल ठाकूरला संधी देऊ शकते. असे यासाठी कारण आजचा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. येथील पिच भारताच्या मागील सामन्याच्या पिचपेक्षा वेगळी आहे.
चेपॉकमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने तीन स्पिनर्स मैदानात उतरवले होते. स्पिन फ्रेंडली विकेटमुळे भारताने ही रणनीती वापरली होती. आता दिल्लीची पिच चेपॉकप्रमाणे स्पिन फ्रेंडली नाही अशातच टीम इंडिया एक स्पिन ऑलराऊंडरच्या जागी फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरला वापरू शकते. येथे आर अश्विनच्या जागी मोहम्मद शमीही खेळू शकतो. मात्र शार्दूलचा दावा यासाठी मजबूत आहे कारण येथे फलंदाजीतही तो चमकू शकतो.
टीम इंडियाच्या प्लेईंग ११मध्ये आणखी एक अपडेट म्हणजे शुभमन गिलही या सामन्यात खेळणार नाही. तो संघासोबत दिल्लीला आलेला नाही. त्याला डेंग्यू झाल्याने गिल आजारी आहे. त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते.
राहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर/आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान, अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक़, मुजीब उर रहमान, फजलहक़ फारुकी
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…