Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीपीएफआय विरोधात महाराष्ट्रासह देशभरात २० ठिकाणी एनआयएची छापेमारी

पीएफआय विरोधात महाराष्ट्रासह देशभरात २० ठिकाणी एनआयएची छापेमारी

विक्रोळीसह भिवंडी आणि नवी मुंबईत एनआयएची छापेमारी

मुंबई/नवी दिल्ली : जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉपुलर फ्रँट ऑफ इंडिया (PFI-Popular Front of India) विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA-National Investigation Agency) महाराष्ट्रासह देशभरात २० ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत छापेमारी केली आहे.

पीएफआय संबंधित ठिकाणी एनआयएकडून मुंबईतील विक्रोळीसह नवी मुंबई, ठाणे येथील भिवंडीमध्येही एनआयएकडून छापेमारी सुरु आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईतील विक्रोळी येथे पीएफआयच्या संदर्भात छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएने विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेखच्या घरी सुमारास एनआयएचे पथक पोहोचले असून छापेमारी सुरु आहे.

मात्र, सकाळी वाहिद शेख हा दरवाजा उघडत नव्हता, जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही असा पवित्रा वाहिदने घेतला होता. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्याच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यानंतर पाच ते सहा तासानंतर वाहिदने दरवाजा उघडला आणि एनआयएच्या पथकाला घरामध्ये घेतले. त्यानंतर आता छापेमारी सुरु आहे.

दहशतवादविरोधी बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्यांतर्गत (UAPA) गेल्या वर्षी पीएफआय संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. केस क्रमांक 31/2022 अंतर्गत देशभरात विविध राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. हे प्रकरण पीएफआय, संबंधित नेते आणि कार्यकर्ते, हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असण्याच्या संबंधांवरून ही छापेमारी करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपी हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांच्या उद्देशाने पाटण्याच्या फुलवारी शरीफ परिसरात जमले होते, अशी माहिती एनआयएला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -