
मुंबई : महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप (Mahadev Online Gaming App) प्रकरणात सुनील शेट्टी (Suniel Shetty), संजय दत्त (Sanjay Dutt), मलायका अरोरा, सोनू सूद, कपील शर्मा यांच्यासह बॉलिवूडमधील नवे, जुने अशा जवळपास ३४ कलाकारांची नावे पुढे आली आहेत.
दावा केला जात आहे की, महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणात सौरभ चंद्राकर हा प्रमुख आरोपी आहे. त्याने केवळ लग्नासाठी २०० कोटी रुपये तर बर्थडे आणि सक्सेस पार्टीसाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले. ईडीच्या तपासात या गोष्टी पुढे आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
महादेव गेमिंग अॅपशी संबंधित 1) रफ्तार, 2) दीप्ती साधवानी, 3) सुनील शेट्टी, 4) सोनू सूद, 5) संजय दत्त, 6) हार्डी संधू, 7), सुनील ग्रोव्हर, 8) सोनाक्षी सिन्हा, 9) रश्मिका मानधना, 10) सारा अली खान, 11) गुरु रंधावा, 12) सुखविंदर सिंग, 13) टायगर श्रॉफ, 14) कपिल शर्मा, 15) नुसरत बरुचा, 16) डीजे चेतस, 17) मलायका अरोरा, 18) नोरा फतेही, 19) अमित त्रिवेदी, 20) मौनी रॉय, 21) आफताब शिवदासानी, 22) सोफी चौधरी, 23) डेझी शाह, 24) उर्वशी रौतेला, 25) नर्गिस फाखरी, 26) नेहा शर्मा, 27) इशिता राज, 28) शमिता शेट्टी, 29) प्रीती झांगियानी, 30) स्नेहा उल्लाल, 31) सोनाली सहगल, 32) इशिता दत्ता, 33) एलनाझ, 34) ज्योर्जिओ अॅड्रियानी या कलाकारांनी महादेव अॅपची जाहीरात आणि प्रमोशन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाशी संबंधित अनेक कलाकारांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यातूनच हे सर्व कलाकार सौरभ चंद्राकर याच्या लग्नाला हजेरी लावताना दिसले. विशेष म्हणजे या हजेरीसाठी या कलाकारांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाल्याचा दावा असून या कलाकारांनी त्या बदल्यात पार्टीत सहभागी होणे आणि परफॉर्म करण्याचे काम केले. केवळ परफॉर्मर कलाकारच नव्हे तर अनेक सेलिब्रेटीसुद्धा या प्रकरणामुळे ईडीच्या रडारवर आले आहेत.