हैदराबाद: न्यूझीलंडने नेदरलँडला हरवत विश्वचषकातील(world cup 2023) दुसरा विजय साजरा केला. किवी संघाने नेदरलँडच्या संघाला ९९ धावांनी हरवले. हा त्यांचा दुसरा विजय आहे. याआधी किवी संघाने इंग्लंडला हरवले होते.या विजयानंतर न्यूझीलंड संघाने पॉईंट्स टेबलमधील आपली स्थिती मजबूत केली आहे. न्यूझीलंडचे दोन सामन्यानंतर ४ पॉईंट आहेत. याशिवाय या संघाचा रनरेटही जबरदस्त आहे. या कारणामुळे न्यूझीलंडचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.
नेदरलँड्सच्या संघासमोर विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान होते. मात्र डच टीमला ४६.३ षटकांत केवळ २२३ धावा करता आल्या. या पद्धतीने न्यूझीलंडच्या संघाने ९९ धावांनी सहज विजय मिळवला. नेदरलँडसच्या संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव सहन करावा लागला. याआधी पाकिस्तानने नेदरलँडला हरवले होते.
कॉलिन एकरमॅनचे अर्धशतक, बाकी सगळ्यांची निराशा
नेदरलँडकडून कॉलिनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७३ बॉलमध्ये ६९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार ठोकले. दरम्यान, बाकी इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. याच कारणामुळे नेदरलँडला पराभवाचा सामना करावा लागला.
मिचेल सँटनरच्या ५ विकेट
न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने यावेळेस धोकादायक गोलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. त्या मॅट हेन्रीने ३ खेळाडूंना बाद केले. याशिवाय रचिन रवींद्रने १ विकेट घेतली.