ENG vs BAN: वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने विजयी खाते उघडले, बांगलादेशला १३७ धावांनी हरवले

धरमशाला: इंग्लंडने बांगलादेशला(ENG vs BAN) १३७ धावांनी हरवले. बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र शाकिब अल हसनचा संघ ४८.२ षटकांत २२७ धावांवर आटोपला. यासोबतच जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने विश्वचषकातील पहिला विजय मिळवत आपले खाते उघडले. याआधी इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ९ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता.


बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दासने सर्वाधिक धावा केल्या. या विकेटकीपर फलंदाजाने ६६ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने आपल्या डावात ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. दरम्यान, त्यानंतर बांगलादेशचे फलंदाज सातत्याने बाद होत गेले. मुशफिकुर रहीमने ६४ बॉलमध्ये ५१ धावा केल्या. तर तौहीद हृदयने ६१ बॉलमध्ये ३९ धावांची खेळी केली. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन, मेहंदी हसन, नजमुल हौसेन शंटो आणि तंजीद हसन या फलंदाजांनी निराश केले.


इंग्लंडसाठी रीस टॉप्लेने सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या. रीस टॉप्लेने १० ओव्हरमध्ये ४३ धावा देत ४ विकेट आपल्या नावे केल्या. क्रिस वोक्सला २ विकेट मिळवता आल्या. याशिवाय मार्क वूड, आदिल रशीद, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एका खेळाडूला बाद केले.



इंग्लंडचा ३६४ धावांचा डोंगर


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने ५० ओव्हरमध्ये ९ बाद ३६४ धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी सलामीवीर डेविड मलानने १०७ बॉलमध्ये १४० धावांची खेळी केली. तर ज्यो रूटने ६८ बॉलमध्ये ८२ धावा केल्या.

Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली