Devendra Fadnavis : कोकणच्या विकासाकडे राज्य शासनाचे विशेष लक्ष; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मंडणगड : शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राज्य शासनाचे कोकणच्या विकासावर विशेष लक्ष असल्याचे व विकासाचा अनुशेष गतीने भरून काढणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंडणगड येथे केले.


न्यायालयाच्या उद्घाटनाकरिता मंडणगड येथे आलेले असताना भिंगळोली येथे भारतीय जनता पार्टीच्या मंडणगड तालुका कार्यालयाचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, श्रीराम इदाते, दापोली तालुका अध्यक्ष संजय सावंत, मंडणगड तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, सचिन थोरे, अशोक गोविलकर, गिरीश जोशी, दादा कोकाटे, उपस्थित होते.


यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या तत्त्वाने भारतीय जनता पक्ष लोकसभा महाविजय २०२४ करिता सज्ज झाला आहे. देशाच्या विकासात हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. विकासाचा रथ पुढे नेत असताना कोकणच्या विकासावर शिंदे सरकारने विशेष लक्ष दिले आहे. येथे पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मितीस चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नात मंडणगडमध्ये नवे न्यायालय सुरू केले असून तालुक्याच्या विविध समस्या, प्रश्नांवर पार्टीच्या माध्यमातून नजीकच्या काळात निश्चितच उत्तरे शोधली जातील.


कार्यालय सुरू केल्याबद्दल तालुका, जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कौतुक करताना भाजप पार्टीचे कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांकरिता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काची जागा आहे. येथे सामान्यांच्या सर्व प्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया. अतिशय विश्वासाचे ठिकाण म्हणून मंडणगडचे कार्यालय नावारूपास येईल आणि लोकांचा विश्वास कार्यालयावर बसेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण