Raj Thackeray : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा

टोलमाफीच्या वक्तव्यावरुन राज ठाकरे सापडणार गोत्यात?


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोल घण्यात येतो, प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल (Toll) नाही, असं वक्तव्य केलं. मात्र याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोध केला. शिवाय या वाहनांकडून टोल घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज मनसैनिकांनी राज्यातील अनेक टोलनाक्यांवर जात आक्रमक भूमिका घेतली होती. मुलुंड येथे तर टोलनाका जाळण्यात आला. राज ठाकरेंमुळे होणार्‍या या नुकसानामुळे त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.


रिपब्लिकन पक्ष (Republican Party) खरात गटाचे प्रमुख सचिन खरात (Sachin Kharat) यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी ही मागणी आहे. सचिन खरात यांनी म्हटले की, टोलच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी तोडफोडीची भाषा वापरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर राज्य आणि देश चालतो. त्यामुळे राज ठाकरेंची तोडफोडीची भाषा ही असंवैधानिक आहे. राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे त्यांनी म्हटले.


राज ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. आम्ही टोलनाक्यांवर आमची माणसे उभी करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिला. राज्यात अन्यत्रही मनसेने टोलवसुलीला विरोध केला आहे, यामुळे हे प्रकरण आणखी काय काय वळणं घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली