“देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना…
सत्य सुंदर मंगलाचे नित्य हो आराधना…”
मानवाचे शरीर म्हणजे त्याची कर्मभूमी आणि त्याचे मन म्हणजे शरीररूपी कर्मभूमीत कर्म करून घेणारा कर्ता. जर मन निर्मळ असेल, तर कर्मही सचेल आणि सुंदर बनते. दररोज सत्याने वागण्याची कास धरण्याची प्रार्थना केली, तर आपले देह मंदिर होऊन मन पावन होईल आणि मानवाचे पूर्ण आयुष्य सत्यार्थ मार्गाने यशस्वी बनेल.
बरे सत्य बोला
बरे सत्य चाला।
बहु मानिती लोक
येणे तुम्हाला।
संत रामदास असोत वा संत तुकाराम. साऱ्याच संतांनी एकमुखाने सत्याची महती गायली आहे. सर्वच धर्मांत त्याचे गोडवे गायलेले दिसतात. आधुनिक युगात जगात सर्वच विधी व न्याय व्यवस्था आजसुद्धा नागरिकांकडून सत्य वर्तनाची अपेक्षा ठेवतात.
पण सत्य म्हणजे नेमकं काय?
सत्य हा शब्द सत् पासून बनला आहे. सत् म्हणजे चांगले. सदाचरण या शब्दांत सत् + आचरण असे दोन शब्द असून त्याचा अर्थ चांगले वर्तन आहे. पण मला वाटते सत्य म्हणजे जे मला कळले, उमगले ते तसेच जसेच्या तसे सांगणे होय. ज्या ज्या व्यक्तींनी सत्याची कास धरली त्या लोकांना दैवत्व प्राप्त झाले असून सत्यवादी असणाऱ्यांनी जगात क्रांती घडवून आणली आणि सकारात्मक विचारप्रवाह आणला. यात प्रथम म्हणजे आपले थोर बापूजी. त्यांनी आयुष्यभर सत्यालाच अढळ स्थान दिले. सत्य वचन बोलले आणि त्याप्रमाणे आयुष्यभर वर्तन केले. सत्याग्रह करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
ईश्वर सत्य हैं,
सत्य ही शिव हैं,
शिवही सुंदर हैं।
सत्य बोलणाऱ्याला आपण ईश्वराचे स्थान देतो कारण, आपण ईश्वराला मानतो.ईश्वर सत्य आहे. सत्य जसं आहे तसं असतं. सत्यामध्ये पारदर्शकता असते. ‘सत्यम शिवम सुंदरम’ असे म्हणतात. कारण सत्य हे पवित्र आहे म्हणूनच ते मंगल आहे.सुंदर आहे आणि जे सुंदर आहे ते देव आहे. सत्यानेच पावित्र्य जपले आहे.
खरं बोलणं हे खूप कठीण जरी असलं तरी अशक्य मुळीच नाहीये. जेव्हा जेव्हा खरेपणाचा दाखला दिला जातो. राजा हरिश्चंद्राचे नाव पुढे येते. ऋषी विश्वामित्राला स्वप्नात दिलेले वचन त्यांनी सत्यात पूर्ण केलं. केवळ राजानेच नाही तर त्याची राणी व राजकुमारानेही वचनपूर्ती करण्यासाठी आपलं संपूर्ण राज्य, राजे पद, संपत्ती विश्वामित्राला दान केली. राजा हरिश्चंद्राने एकदा दिलेले वचन आमरण पालन केल.
साने गुरुजी म्हणजे श्यामची आईने ही श्यामला अगदी लहानपणापासूनच खरे बोलावे. खोटे बोलू नये, असे सुसंस्कार लावले. त्याच्या संस्कारित उपदेशामुळेच श्यामचे थोर साने गुरुजी बनले. थोर जिजाऊंनी शिवरायांना सत्याने स्वराज्य उभारण्यात सांगितले आणि शिवराय हिंदवी स्वराज्याचे छत्रपती बनले.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाचे युगात आपण प्रचंड प्रगती केली या आधुनिक युगात सत्याच महत्त्व तर अनेक पटीने वाढले आहे. अनेक प्रसारमाध्यमांमुळे सत्य उघडकीला येतं. मोबाइल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर अशी संपर्क माध्यमातून एका सेकंदात महत्त्वाची माहिती पोहोचवतात. कधी कधी ती माध्यमं म्हणजे दुर्धार शस्त्र ठरतात. काही वेळेस खऱ्याच्या नावाखाली खोट्या बातम्या रंगवून ठळकपणे जनतेसमोर मांडल्या जातात. पण अंतिम विजय सत्याचाच असतो. सत्यमेव जयते! परमेश्वराने खुद्द सत्याचा सर्वात मोठा आश्रय घेतला, कारण सत्य अमर आहे, विजयी आहे.
विंदा करंदीकर म्हणतात,
‘सत्यात स्वप्न सामील जाहलेले’
आपणास सतत प्रत्यक्ष जे काही मिळत नाही. त्याचा आपण सतत मागोवा घेतो. स्वप्न आकलन क्षमतेच्या बाहेरच असतं.पण ते साकारण्यासाठी आपण प्रयास करतो. अशीच ध्येयवादी स्वप्न आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे सत्यात उतरतात. म्हणूनच म्हणतात ना, ‘मनी वसे ते स्वप्ने दिसे आणि तेच सत्यात साकारे…’ ज्याप्रमाणे सत्य असणाऱ्या परमेश्वराबद्दल आपणास आदरयुक्त भीती आणि प्रेम असते. त्याचप्रमाणे सत्यवादी लोकांना सगळेच घाबरतात. म्हणूनच सत्य हे ईश्वर आहे.
स्वातंत्र्य मिळवून देणारे टिळक, आगरकर महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग अशा अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांनी सत्याची कास पकडून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा इतिहास गौरवशाली आहे. सत्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच आपणास यश मिळते सत्य हे नैसर्गिक आहे.
महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्दुल कलाम हे सत्याने वागले म्हणूनच ते जगभरात प्रसिद्ध झाले, सन्मानित झाले. सत्य बोलणारी सर्वांना प्रिय असतात. खऱ्या आणि खोट्याची जेव्हा परीक्षा घेतली जाते. तेव्हा त्याचा ठराव न्यायालयात मांडावा लागतो. न्यायाधीशासमोर प्रत्येक व्यक्तीला गीतेवर म्हणजेच पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घ्यावी लागते, ‘ईश्वरशपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही.’ याचा अर्थ असा की खरेपणा जगासमोर येण्यासाठी ईश्वराची साक्ष घ्यावी लागते. म्हणूनच खरे आणि ईश्वर हे एकच आहेत. सत्याचा विजय हा अंतिम विजय असतो. सत्य बोलणाऱ्या व्यक्तींचाच आपण सन्मान करतो व त्यांना प्रेम करतो. सत्य कधीच लपत नाही सत्य जरी कटू असलं तरी ते बोललं गेलं पाहिजे, त्यामुळे भविष्यात सुख समाधान येते.
‘सत्य की मशाल जलती रहे,
प्यार का कारवा बढता रहे।
सत्याची मशाल अशीच पेटवण्याची कास आपण मनात बाळगली, तर संपूर्ण जग सुंदर होईल. जगात प्रेम राहील. जग पावन होईल. कारण, सत्य हाच परमेश्वर आहे आणि ईश्वर हेच सत्य आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…