नवी दिल्ली : चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये (Asian games 2023) भारताने आतापर्यंतची सर्वांत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. भारताच्या खेळाडूंनी पदकांचे शतक (Century of medals) गाठले आहे. २६ सुवर्ण (Gold), ३५ रौप्य (Silver) आणि ४० ब्राँझ (Bronze) पदकांची कमाई करत भारत सर्वाधिक पदकांच्या यादीत चौथ्या स्थानावर स्थिरावला आहे. आज महिलांच्या कबड्डी संघाने तैपेईचा पराभव करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि भारताच्या एकूण पदकांची संख्या १०० झाली. तर ओजस देवतळेने पुरुषांच्या तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ही संख्या १०१ वर नेली.
भारताच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड खूश झाले आहेत. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे व त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, आशियाई क्रीडा स्पर्धेतील ही भारतासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. आम्ही १०० पदकांचा उल्लेखनीय टप्पा गाठला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारताने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे अशा आमच्या अभूतपूर्व खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, आपल्या खेळाडूंच्या प्रत्येक विस्मयकारक कामगिरीने इतिहास घडवला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० तारखेला आमच्या आशियाई खेळाडूंशी भेटीचे आयोजन करणार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे, अशा भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. आता भारताने आणखी चमकदार कामगिरी करत आधिकाधिक पदके जिंकावीत अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…